एखादी व्यक्ती जेव्हा सेलिब्रिटी म्हणुन नावारूपाला येते तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यक्तीगत आयुष्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतात.त्यांच्याबद्दल सतत काही ना काही धक्कादायक खुलासे होत असतात. नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीनुसार, मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.एका प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.
हा आरोप मल्याळम अभिनेता विजय बाबू याच्यावर लावण्यात आला आहे. विजय बाबू हा मल्याळम सिने क्षेत्रातला एक लोकप्रिय चेहरा आहे.ते अभिनेता तसेच एक उत्तम निर्माता आणि उद्योजकसुद्धा आहे. परंतु या अभिनेत्याबद्दल अशी माहिती समोर येताच मनोरंजनसृष्टी हादरुन गेली आहे.
कोडीझोड भागात राहणाऱ्या पीडित महिलेने विजय बाबू विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ‘चित्रपटांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवुन तिचे विजय बाबू यांनी शारीरिक शोषण केले आहे’.
‘एर्नाकुल भागात असलेल्या आपल्या फ्लॅटवर विजय बाबूने कामाचं आमिष दाखवून आपल्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आहेत. दरम्यान २२ एप्रिल रोजी विजय बाबू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
परंतु अद्यापही पोलिसांनी या प्रकरणात विजय बाबू यांची चौकशी केलेली नाहीय. विजय बाबू विरुद्ध बलात्कार आणि गंभीर प्रकारे शारीरिक इजा पोहोचवल्याच्या तक्रारीची नोंद करण्यात आली आहे.पीडितेच्या या तक्रारीवरून आत्ता विजय बाबू अडचणीत येण्याची शक्यता आहे.
परंतु हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं सांगत विजय बाबूने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकंच नव्हे तर संबंधित अभिनेत्रीविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
अजब गजब लव्हस्टोरी! अखेर विशालला कुसुमचा मेसेज मिळाला, १० रुपयांची नोट पुन्हा व्हायरल
‘देशातील १२३ कोटी लोकांचा रक्तगट हा छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज हाच असला पाहिजे’
VIDEO: नेहा कक्करने पुष्पाच्या गाण्यावर केला भन्नाट डान्स, हॉट बिचवर दिसल्या हॉट अदा
खुपच डॅशिंग आणि सुंदर आहे ‘ही’ महिला IPS; तिची झलक पाहून दिग्दर्शकाने दिली होती चित्रपटात काम करण्याची ऑफर