भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर काही दिवसांपूर्वीपासुन मुंबईत दोन वेळा हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला, असा आरोप करत सोमय्या यांनी थेट दिल्लीकडे धाव घेतली आणि केंद्रीय गृहसचिवांकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.
मात्र या हल्ल्याबाबत आता महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. किरीट सोमय्या यांना झालेली जखम गंभीर नसल्याचं भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्याचं समोर येत आहे.
काय आहे भाभा रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल
भाजपन नेते किरीट सोमय्यांना किरकोळ जखम झाल्याचा अहवाल भाभा रुग्णालयाने दिला आहे . सोमय्यांना जखम झाल्यावर कसलाही रक्तस्त्राव झाला नाही , असंही या वैद्यकी अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे . किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा अहवाल समोर आला आहे.
सोमय्यांना कोणत्याही प्रकारे गंभीर इजा झाली नसल्याची माहिती भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली . त्यामुळे आता किरीट सोमय्या यांच्या हनुवटीला दिसत असणाऱ्या रक्तावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे .
शनिवारी काय झालं होतं ?
शनिवारी किरीट सोमय्या हे अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा व रवी राणा यांची भेट घेण्यासाठी गेले. खार पोलीस स्थानकात भेट घेऊन झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले . त्यावेळी दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली . त्यात एक दगड किरीट सोमय्यांच्या गाडीवर भिरकावला गेला . या हल्ल्यात सोमय्यां जखमी झाले.
प्रसार माध्यमांनी टिपलेल्या दृश्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्या हनुवटीतून रक्तस्त्राव होत असल्याचं दिसून आलं होतं . सोमय्यांच्या गाडीची काच दगडफेकीत फुटली होती . त्यात त्यांना जखम झाली असल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं होतं . दरम्यान , किरीट सोमय्यांची जखमी खरी आहे की खोटी, अशी शंका घेतली जात होती .
वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांना लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी याआधीच सोमय्या यांच्यावर निशाणा साधत ते चेहऱ्याला टोमॅटो सॉस लावून फिरत असल्याची टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या
सोमय्यांवरील हल्ल्यावेळी Z सेक्युरिटी कुठे होती? जाब विचारणाऱ्या CISFला आयुक्तांकडून जशास तसे उत्तर
नितेश राणे यांना आपल्याच मतदार संघातील गावात जाण्यास बंदी, धक्कादायक कारण आले समोर
मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना, १० भाविकांचा जागीच मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर
१८ दिवस फक्त पाणी प्यायलो, एका पोलिसाचा जीव वाचवला; सदावर्तेंनी सांगितला जेलचा हैराण करणारा अनुभव