अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर आरोप केला होता, की आपण मागासवर्गीय असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत त्यांनी एक पत्र थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवले होते. या पत्राची दखल घेत या संदर्भातील अहवाल २४ तासांच्या आत सादर करण्याचा आदेश लोकसभा सचिवांनी दिला होता.
त्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी एक ट्विट करत नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिस स्टेशन मध्ये आदराची वागणूक दिल्याचे निदर्शनास आणणारा एक व्हिडिओ ट्विट केला. त्यामुळे राणांनी पोलिसांवर केलेले आरोप हे बिनबुडाचे ठरले आहेत.
संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत राणा यांचे आरोप खोटे असल्याचे सांगीतले आहे. हा व्हिडीओ खार पोलीस ठाण्यातला आहे. ‘आम्हाला आणखी काय बोलण्याची गरज आहे का’, असंही पांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. पांडे यांनी यापेक्षा जास्त काहीही न लिहिता व्हिडीओतून पोलिसांनी राणा दांपत्याना कोणतीही अपमानास्पद वागणुक दिली नसल्याचे सिद्ध केले आहे. खुद्द मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनीच हा व्हिडीओ ट्विट केल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पांडे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राणा दाम्पत्य हे अत्यंत शांत वातावरणामध्ये चहा पित असल्याचे दिसत आहे.
नवनीत राणा यांनी पोलिसांवर केलेले आरोप
राणा यांच्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की मुंबई पोलिस जातीयवादी आहेत. आपण मागासवर्गीय असल्याने खार पोलीस ठाण्यात चुकीच्या पद्धतीची वागणुक देण्यात आली. मागणीनुसार प्रसाधन गृहात जाऊ दिले नाही, पाणीही दिले नाही. पण त्यांना त्याच मध्यरात्री सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आले होते.
त्याचबरोबर मुंबई पोलिस आणखी एक व्हिडिओ समोर आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या व्हिडिओत नवनीत राणा यांना त्यांच्या मागणीनंतर प्रसाधनगृहात नेण्यात आले होते. प्रसाधनगृहा बाहेरील सीसीटीव्हीत हे दृश्य कैद झाले आहे. त्यामुळे, मुंबई पोलिसांवर खोटा आरोप केल्याप्रकरणी आता नवनीत राणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे .
महत्वाच्या बातम्या
स्त्रीयांबद्दल ‘असे’ विचार करायचे संजीव कुमार, त्यामुळं आयुष्यभर बॅचलर राहिले, वाचून व्हाल अवाक
महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत, तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
सुंदरतेत बॉलिवूडमधील मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देते सचिनची मुलगी सारा, पहा ग्लॅमरस फोटो
इरफान पठानने घडवला उमरान मलिकपेक्षा खतरनाक गोलंदाज, पोलिसाची नोकरी सोडून बनला क्रिकेटर