पेट्रोलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर वळत आहे. सरकारनेही इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे कितपत योग्य आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. (sachin gitte ola scooter)
बीड जिल्ह्याच्या परळीतील ग्राहक सचिन गित्ते यांनी ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. पण ती फक्त सहाच दिवसांत बंद पडली. ती काही केल्या सुरुच होत नव्हती. कंपनीकडूनही कोणता प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी ती स्कूटर गाढवाला बांधून गावभर फिरवली आणि निषेध व्यक्त केला.
परळी इथले व्यापारी सचिन गित्ते यांनी १६ सप्टेंबर २०२१ ला २० हजार रुपये भरत ओला कंपनीची स्कूटर ऑनलाईन बुक केली. २१ जानेवारी २०२२ रोजी उरलेले ६५ हजार भरल्यानंतर त्यांना स्कूटर ताब्यात देण्यात आली. पण अवघ्या सहा दिवसांतच ही स्कूटर बंद पडली.
दुचाकी बंद पडल्यानंतर सचिन गित्ते यांनी कंपनीशी संपर्क साधला. कंपनीचा मेकॅनिक येऊनही दुचाकी दुरुस्त झाली नाही. कंपनीकडून हजारो गाड्यांची विक्री होत असताना कुठेच डिलर अथवा तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर शोरुम नाहीत. कस्टमर केअरवर फोन करुनही वारंवार उडवाउडविची उत्तर मिळत आहे.
पैसे देऊन घेतलेली दुचाकी बंद पडल्याने आणि त्यानंतर कंपनीकडूनही कोणता प्रतिसाद न मिळाल्याने सचिन गित्ते यांनी कंपनीचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी गाढवाच्या साहाय्याने ती स्कूटर ओढत गावभर फिरवलीये. गाढवाच्या पाठीवर त्यांनी ओला कंपनीचा निषेध असलेला फलक लावला होता.
ओला या फसव्या कंपनीपासून सावध राहावे. ओला कंपनीच्या दुचाकी खरेदी करु नका, असे जाहीरपणे सांगत राणी लक्ष्मीबाई टॉवर परीसरात गाढवाच्या पाठीमागे दुचाकी बांधत रस्त्यावरुन त्यांनी निषेध नोंदवला आहे. त्यामुळे सध्या सचिन गित्ते यांची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
नवनीत राणांना पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याच्या आरोपांवर गृहमंत्री स्पष्टच बोलले, म्हणाले…
भाजपा लागला २०२४ च्या निवडणूकांच्या तयारीला; जाणून घ्या काय आहे भाजपचा मास्टर प्लॅन….
चोरट्यांनी चक्क जेसीबीनेच उचलले एटीएम; पहा सीसीटिव्हीत कैद झालेला खतरनाक व्हिडीओ






