मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएल सिजनमध्ये पुर्ण फ्लॉप ठरताना दिसून येत आहे. संघाला चांगली कामगिरी करता येत नाहीये. बुधवारी मुंबई विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना झाला होता हा सामनाही मुंबईने गमावला. मुंबईने आतापर्यंत सलग सात सामने गमावले असून यंदाच्या सिजनमध्ये त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. (mumbai indians deleted tweets)
संघाच्या विजयासाठी रोहित शर्मा संघात बदल करताना दिसून येत आहे. असे असताना रोहित शर्माने अनुभवी वेगवान गोलंदाज धवन कुलकर्णीला संघात घेण्याची मागणी केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे लवकरच या गोलंदाजाचा मुंबईच्या संघात समावेश होऊ शकतो, असेही म्हटले जात होते.
असे असतानाच मुंबई इंडियन्सच्या संघात काहीतरी गोंधळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सचा डावखुरा गोलंदाज टायमल मिल्सने एक ट्विट केले होते. पण काहीच वेळानंतर त्याने ते ट्विट डिलीट केले, त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे.
धवल कुलकर्णीची संघात एंट्री होणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर लगेचच टायमल मिल्सला दुखापत झाल्याचे म्हटले जात होते. पण टायमलने आपल्याला दुखापत झालेली नाहीये, असे ट्विट केले. तु कोण आहेस आणि तुला ही माहिती कुठून मिळाली हे मला माहिती नाही. पण तुझा दावा चुकीचा आहे. मी ठीक आहे, असे टायमलने म्हटले होते.
त्यानंतर काही वेळानंतर टायमल्सने हे ट्विट डिलीट केले होते. पण यावरुन आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. टायमलने सुरुवातीच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. ५ सामन्यात त्याने ६ विकेट्स घेतल्या होत्या. राजस्थानविरुद्ध ३/३५ अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. पण पंजाब आणि लखनऊ विरुद्ध सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी धवल कुलकर्णीला संधी मिळू शकते असे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाच्या वेगवान गोलंदाजीला धार देण्यासाठी कुलकर्णीचा समावेश करण्याची मागणी केली आहे. कुलकर्णी हा मूळचा मुंबईचा आहे, त्यामुळे मुंबई आणि पुण्यात गोलंदाजी कशी करायची हे त्याला चांगले माहीत आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘RRR’ आणि ‘KGF 2’ च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘यात चित्रपट कुठंय?’
दिलेला शब्द कसा पाळायचा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं; आदेश बांदेकरांनी सांगितला आनंद दिघेंसोबतचा किस्सा
कपिल शर्माने तो प्रश्न विचारताच भडकला अजय देवगण, म्हणाला, तुझ्यापेक्षा तर जास्तच नंबर..