Share

शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घालण्याऱ्या सोमय्यांचे तोंड शिवसैनिकांनी फोडले; जाणून घ्या नेमकं काय घडलं

राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. मुंबईमध्ये सध्या वातावरण तापलेले आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिकांनी राडा केला असून किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर शिवसैनिकांनी असा आरोप केला आहे की, किरीट सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली. किरीट सोमय्या आज रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटण्यासाठी खार पोलिस स्टेशन येथे गेले होते.

यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. किरीट सोमय्या जेव्हा परत जात होते तेव्हा शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी खार पोलिस स्टेशनबाहेरच किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक केली. यापुर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.

काही दिवसांपुर्वीच किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला करत त्यांच्या गाडीवर दगडफेक केली होती आणि या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काचही फुटली होती. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी आरोप केला आहे की, किरीट सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती.

शिवसैनिकांच्या या दाव्यानंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत शिवसैनिकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. ते गाडीतच बसून आहेत. हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

जोपर्यंत पोलिस कमिश्नर येत नाही तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत. किरीट सोमय्यांच्या तोंडाला दुखापत झाली आहे. हल्याविरोधात किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेतली आहे. दरम्यान पोलिस आता यावर काय ऍक्शन घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजप यावर काय भूमिका घेईल आणि यावरही सगळ्यांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या
मुंबई पोलिस आणि उद्धव ठाकरेंच्या संगमताने हा हल्ला झाला, सोमय्यांचा गंभीर आरोप
राणा दाम्पत्याला सोडवायला येणार होता भाजपचा ‘हा’ बडा नेता, पण अचानक…
१७ वर्षीय मुलीला गरोदर केल्याप्रकरणी १२ वर्षीय मुलावर गुन्हा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
…अन्यथा मी स्वत: राणांना बाहेर काढण्यासाठी जाईल; नारायण राणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now