नुकतंच भाजप आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आपली भूमिका मांडत उद्धव ठाकरेंविरोधात रणशिंग फुंकले आहेत. त्यांनी घोषणा केली होती की, मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसाचे पठण करणार. आता त्यांच्या या भूमिकेवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरेंनीही सांगितले आहे की, मातोश्रीवर यायची कोणाची हिंमत नाही. आता त्यांच्या या भूमिकेनंतर उद्या काय होणार यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या बंगल्यासमोर गर्दी केली आहे. कार्यकर्ते तेथून हालचाल करण्यास तयार नाहीत.
जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही घरी जा, मातोश्रीवर यायची कोणाची हिंमत नाही. असं ठणकावून त्यांनी सांगितले आहे पण शिवसैनिक ऐकायला तयार नाहीत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा शनिवारी मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत.
शनिवारी वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यासाठी ६०० हून अधिक कार्यकर्ते अमरावतीहून मुंबईला आल्याची माहिती मिळाली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. शिवसेनेला डिवचू नये अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे त्यामुळे उद्या मुंबईत वाद होण्याची शक्यता आहे.
आज अनेक शिवसैनिक मातोश्रीवर जमा झाले आहेत. हे कार्यकर्ते आज रात्रभर मातोश्रीच्या बाहेरच मुक्काम ठोकणार आहेत. हे कार्यकर्ते त्याच ठिकाणी थांबले आहेत ज्या ठिकाणी राणा दाम्पत्य येणार आहे. दरम्यान, होणाऱ्या विरोधाची परवा न करता आम्ही हनुमान चालीसा वाचणार असल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे.
हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर राणा दाम्पत्याने अमरावती पोलिसांना चकवा देत मुंबई गाठली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी निर्धार केला आहे की ते मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचणारच. आता उद्या काय होणार? यावर सगळ्यांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
लग्न करून नाही तर लिव्ह इनमध्ये राहणार केएल राहुल आणि अथिया, मुंबईमध्ये ‘या’ ठिकाणी घेतला फ्लॅट?
सरकारी खर्चातून मंत्र्यांची कोरोना बिलं भरण्याच्या प्रश्नावर अजित पवार भडकले; म्हणाले…
हा स्पर्धेक ठरला ‘Indian Idol Marathi’च्या पहिल्या सीझनचा विजेता; ट्रॉफीसह मिळाली एवढी मोठी रक्कम
VIDEO: ‘KGF 2’ च्या रॉकीभाईने हिंदीत बोलून जिंकली लोकांची मने; म्हणाला, टाळ्या, शिट्ट्या वाजवून..