रोहित शर्माने मॅच फिक्सिंग केली? सलग सातव्या पराभवानंतर रोहितवर झाला गंभीर आरोप

इंडियन प्रीमियर लीग २०२२ सीझनमध्ये गुरुवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईने तीन विकेट्सने हा सामना जिंकला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका बजावताना दिसून आला. (rohit sharma match fixing meme)

एकीकडे चेन्नईने या सिजनमधील आपला दुसरा विजय मिळवला, तर मुंबईला सलग सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाचवेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई संघाला यंदा एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांच्या या खराब खेळीमुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.

सोशल मीडियावर मुंबईच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा मोठ्या प्रमाणात ट्रोल होतोय. कारण त्याला चेन्नई विरुद्धच्या सामन्यात १ धावही करता आली नाही, तो शुन्यावर बाद झाला. त्याच्या या खेळीमुळे त्याचे चाहतेही निराश झाले. अशातच एका युजरने एक धक्कादायक ट्विट केलं आहे.

एका युजरने रोहित शर्मावर थेट मॅट फिक्सिंगचा आरोप केला आहे. सध्या त्या युजरचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यावेळी अनेकांनी रोहित शर्माची विराट कोहलीशी तुलना केली आहे. रोहितने विराट कोहलीला कॉपी केल्याचे काही लोकांनी म्हटले आहे.

विराट गेल्या सामन्यात शुन्यावर आऊट झाला होता. त्यामुळे इशान किशन आणि रोहित शर्माने त्याची कॉपी केली आहे. त्यामुळे ते दोघेही शुन्यावर आऊट झाले आहे, असेही एका युजरने म्हटले आहे. सध्या रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सवरचे मीम्स खुप व्हायरल होत आहे.

मुंबईने आतापर्यंत सलग सात सामने गमावले आहे. पण त्यांच्या सध्याच्या स्थितीला रोहित शर्मा आणि इशान किशन जबाबदार असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबईला चेन्नईविरुद्ध फलंदाजी करताना विशाल स्कोर उभा करता आला नाही. त्यांना फक्त १५६ धावाच करता आल्या. गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यातही मुंबई अपयशी ठरली आणि सामना गमावला.

महत्वाच्या बातम्या-
फक्त रोज ३० रुपये वाचवा अन् करोडपती व्हा; बचतीची ‘ही’ भन्नाट आयडिया ऐकून हैराण व्हाल
“शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग”
‘या’ शुगर स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे आयुष्य झाले गोड, वर्षभरात दिला तब्बल ४४० टक्के परतावा