Share

धोनी मैदानात होता, त्यामुळे आम्ही जिंकणार हे ठरलेलं होतं; सामना जिंकल्यानंतर जडेजाने केले धोनीचे कौतूक

इंडियन प्रीमियर लीग २०२२ सीझनमध्ये गुरुवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईने तीन विकेट्सने हा सामना जिंकला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका बजावताना दिसून आला. (jadeja bows down after seeing dhoni)

धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना चेन्नईला जिंकवून दिला. तो १३ चेंडूत २८ धावा करत नाबाद राहिला. धोनीची फलंदाजी पाहून सगळेच हैराण झाले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत मुंबई सामना जिंकेन असे वाटत होते. पण धोनी मैदानात असताना ते शक्य नाही, हे पुन्हा धोनीने दाखवून दिले.

तसेच जेव्हा सामना जिंकून धोनी परतत होता, तेव्हा चेन्नई संघाचा नवा कर्णधार रवींद्र जडेजा त्याच्यापुढे नतमस्तक झालेला दिसला. जडेजाने कॅप काढून धोनीला वाकून नमस्कार केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. तसेच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहे.

सामन्यानंतर जडेजा म्हणाला, ज्याप्रकारे सामना सुरू होता त्याप्रमाणे आम्ही सर्वजण खूप चिंतेत होतो, परंतु सामन्याचा महान फिनिशर मैदानात उपस्थित होता. अशा स्थितीत आम्हालाही जिंकण्याची संधी आहे, याची जाणीव होती. धोनी मैदानात होता, त्यामुळे आम्ही जिंकणार हे ठरलेलं होतं, असे जडेजाने म्हटले आहे.

https://twitter.com/IPL/status/1517206633323331584?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517206633323331584%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.republicworld.com%2Fsports-news%2Fipl-2022%2Fskipper-jadeja-bows-down-to-god-of-cricket-ms-dhoni-post-last-over-thriller-watch-articleshow.html

तसेच तुम्ही सामना जिंकत नसला तरी तुम्ही शांत राहायला हवे. क्षेत्ररक्षण करताना झेल सुटतो. त्यामुळे मी क्षेत्ररक्षणाला कधीच हलक्यात घेत नाही आणि जास्तवेळ सराव करतो. आमच्या संघाला क्षेत्ररक्षणाचा जास्त सराव करण्याची गरज आहे, असेही जडेजाने म्हटले आहे.

सलग सातव्या पराभवानंतर मुंबईच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कडवी लढत दिली. सामन्यात आमची वाटचाल योग्य दिशेने सुरु होती. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी आम्हाला विजयाच्या शर्यतीत ठेवले होते. पण धोनी समोर असताना विजय मिळवणे अवघडच होते. धोनी शांत राहून कसा सामना खेचून नेतो हे सर्वांना माहिती आहे, असे रोहितने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंना सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतील; सेनेच्या वाघाची जहरी टीका
अवघ्या १०० रुपयांत जोडप्याने खरेदी केलं घर; खोलीतून बाहेर पडताच समोरील दृश्य पाहून बसला मोठा धक्का
मुंबई इंडीयन्सच्या अपयशाला रोहीत शर्माच जबाबदार; ‘ह्या’ निर्णयांचा बसला मोठा फटका

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now