धनंजय मुंडेंकडे ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या तरुणीला अटक; नाव ऐकून धक्का बसेल

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली होती. एका महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्या महिलेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात त्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेला सोपवण्यात आले होते. आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. संबंधित महिलेला मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

संबंधित महिलेचे नाव रेणू शर्मा असे आहे. त्या महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच पैसे दिले नाही, तर सोशल मीडियावर बदनामी करेल आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी त्या महिलेने दिली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

धनंजय मुंडे यांनी आपण या महिलेला ओळखत असल्याचे म्हटले होते. तसेच आपण या महिलेला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तीन लाख रुपये दिले असून एक मोबाईल तिला कुरीअरच्या माध्यमातून पाठवला होता, असे धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटले होते.

रेणू शर्मा हिनेच मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर काही दिवसातच महिलेने ती तक्रार मागे घेतली होती. तेव्हापासूनच ती परदेशातील नंबरवरुन मला मेसेज, फोन करत होती आणि पैसे मागत बदनामी करण्याची धमकी देत होती, असे धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, रेणू शर्मा ही मूळ मध्य प्रदेशच्या इंदोरची असून ती करुणा शर्माची बहिण आहे. धनंजय मुंडे यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचने आणि इंदोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केले आहे. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले आहे. आता मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या-
आज फक्त कार्यालयात घुसलोय, उद्या घराघरात घुसू; ब्राम्हण महासंघाची राष्ट्रवादीला थेट धमकी
प्रियांका चोप्राच्या मुलीच्या नावात आहे ‘या’ खास व्यक्तीचा उल्लेख, जाणून घ्या
हार्दिकचे मसल्स पक्षासारखे पातळ, त्याच्यात गोलंदाजी करण्यासाठी जीव नाही, पाकिस्तानी गोलंदाजाचे बेताल वक्तव्य