Share

श्रीलंकेसारखी परिस्थिती होण्याआधी जनतेने धर्मांध राजकारण बाजूला सारावे; राष्ट्रवादीचे आवाहन

sharad pawar

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा वादाचा ठरत आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा आरोप केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेही राज ठाकरेंवर टीका करताना दिसून येत आहे. (ncp request to people)

अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबूक पेजवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यावरुन त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत भाजपवरही टीका केली आहे. यावेळी श्रीलंकेसारखी परिस्थिती होण्याआधी जनतेने धर्मांध राजकारण बाजूला सारावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

फेसबूक पोस्ट-
महागाईचा भोंगा जोरात वाजतोय

श्रीलंकेसारखी परिस्थिती होण्याआधी जनतेने धर्मांध राजकारण बाजूला सारावे
मार्च २०२२ महिन्यामध्ये घाऊक महागाईचा वार्षिक दर (WPI) १४.५५ टक्क्यांवर गेला आहे. हा दर मार्च २०२१ मध्ये ७.८९ टक्के होता. याचा अर्थ घाऊक बाजारातील महागाई मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. नैसर्गिक वायू, पेट्रोलियम उत्पादने, खनिज तेल, मूलभूत धातू इत्यादीच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम एकूणच सर्व स्तरातील महागाईवर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी या महागाई वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्या तरी केंद्र सरकार या महागाईकडे कसे पाहते, हा आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. महागाई सातत्याने वाढत असताना देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कर्नाटकमधील हिजाब प्रकरण, जेएनयूमध्ये श्रीराम नवमीला घडलेले हिंसक कृत्य, महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांचा विषय, हिंदूंनी अधिक मुलं जन्माला घालावीत अशी विधाने, याद्वारे समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.

पण या सर्व गदारोळात सर्वधर्मीय जनता महागाईमध्ये होरपळली जातेय. या धर्मांध राजकारणामुळे मूळ गंभीर विषयांना बगल दिली जात आहे. त्यामुळे आता जनतेनेच धार्मिक मुद्द्यांकडे लक्ष न देता महागाईवर सातत्याने केंद्र सरकारला प्रश्न विचारत राहिले पाहीजे.

महत्वाच्या बातम्या-
मशिदींवरील भोंग्यांबाबत संजय राऊतांचं थेट मोदींना आवाहन; म्हणाले, ‘हिंमत असेल तर…’
27 मंदिरे पाडून बांधली गेली कुतुबमिनार जवळील मशीद, प्रसिद्ध इतिहासकारांचा मोठा दावा
बॉलिवूडवर शोककळा! अमिताभ बच्चनला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं दुःखद निधन

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now