Share

राम हा देव नाही तर…; माजी मुख्यमंत्र्यांनी केले वादग्रस्त विधान, देशभरात उडाली खळबळ

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामध्ये त्यांनी श्री रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

तसेच त्यांनी रामाला वाल्मिकी आणि तुलसीदास यांच्या कवितेचे पात्र म्हटले आहे. सिकंदरा येथील लच्छूआर येथे माता साबरी महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान जीतन मांझी यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. मांझी यांनी यापूर्वीही श्री रामाबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत.

सिकंदरा, जमुई येथे आयोजित एका कार्यक्रमात जीतन राम मांझी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, राम हे देव नसून वाल्मिकी आणि तुलसीदासांचे काव्य पात्र होते. मांझी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सवर्ण आणि मोठ्या लोकांविरोधातही धक्कादायक विधाने केली आहे.

आपल्या देशात असणारे मोठे लोक आणि उच्च जातीचे लोक बाहेरच्या देशातील आहेत, ते आपल्या देशाचे मूळ रहिवासी नाहीत.जे ब्राह्मण मांस खातात, दारू पितात, खोटे बोलतात, अशा ब्राह्मणांना पूजापाठ करायला लावणे हे पाप आहे, असेही जीतन मांझी यांनी म्हटले आहे.

तसेच जाहीर सभेला संबोधित करताना मांझी म्हणाले की, आपल्या भारतात दोनच जाती आहेत. त्यातली एक म्हणजे श्रीमंत आणि दुसरी म्हणजे गरीब. या देशात श्रीमंताचा मुलगा खासगी शाळेत शिक्षण घेतो, तर गरिबाचा मुलगा सरकारी शाळेत शिक्षण घेतो.

दरम्यान, याआधीही मांझी यांनी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना काल्पनिक म्हटले होते. त्यांनी आपल्या विधानात म्हटले होते की, श्रीराम हे जिवंत किंवा महान व्यक्ती होते यावर त्यांचा विश्वास नाही, परंतु त्यांनी हे मान्य केले की रामायणात अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्या जीवनात पाळण्यासारख्या आहेत.

मांझी यांच्या या वक्तव्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. तसेच विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याची पुनरावृत्ती केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या मेंदूवर उपचार करा, असे भाजप नेते म्हणत आहे.

महत्वाच्या बातम्या-
सामूहिक हत्याकांड! 3 मुलींसह कुटुंबातील पाच जणांचा चिरला गळा, थरारक घटनेनं देश हादरला
भर बैठकीत लष्करप्रमुखांनी इम्रान खान यांच्या लावली कानाखाली? वाचा व्हायरल पोस्टमागचे सत्य
पराभव झाला तर हिमालयात जाईल म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांची झाली गोची; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now