आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या हंगामात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. सर्वच संघ एकमेकांविरूद्ध जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र विजय त्याच संघाच्या वाट्याला येत आहे, ज्यांची कामगिरी चांगली होत आहे. आयपीएलच्या या हंगामात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ चमकदार कामगिरी करत आहे.
आयपीएलच्या या मोसमात आरआरने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये संघाला दोन सामन्यात विजय मिळाला आहे, तर एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आयपीएलच्या मध्यावर आरआरच्या एका दमदार खेळाडूने लीगमध्येच मोठी घोषणा केली आहे.
आम्ही ज्या खेळाडूबद्दल बोलत आहोत तो दुसरा कोणी नसून राजस्थान रॉयल्सचा दिग्गज खेळाडू जिमी नीशम आहे. जिमी नीशम नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांना वेगवेगळ्या पोस्टद्वारे आश्चर्यचकित करत असतो. यावेळीही त्याने आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
जिमी नीशमने सराव सत्राचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जिमी नीशम रियान परागला गोलंदाजी करत आहे. रियान परागने नीशमच्या चेंडूवर एक्का असा फटका मारला की तो थेट जिमी निशमच्या चेहऱ्याजवळून गेला.
परागच्या या शॉटवर नीशम थोडक्यात बचावला. यानंतर जिमी नीशमने इंस्टाग्रामवर लिहिले की, मी आतापासून माझी निवृत्ती जाहीर करतो. पण जिमी नीशमच्या या पोस्टमध्ये एक ट्विस्ट आहे. जिमी नीशमने रियान परागला नेटमध्ये गोलंदाजी करण्यापासून संन्यास घेतला होता पण नेटकऱ्यांनी त्याचा वेगळाच अर्थ घेतला आणि सोशल मिडीयावर चर्चांना उधाण आले होते.
अनेकांना ही पोस्ट वाचल्यानंतर धक्का बसला होता पण नंतर सत्य बाहेर आले तेव्हा सगळ्यांना समजले की जिमी नीशम आपली खेचत आहे. दरम्यान, सध्या आयपीएलमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. राजस्थान चांगली कामगिरी करत आहे पण जे चेन्नई आणि मुंबईसारखे दिग्गज संघ आहेत ते रसातळाला गेले आहेत.
महत्वाच्या बातम्या
मशिदींवरील भोंगे काढा हा सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश; राज ठाकरेंनी पुरावाच दाखवला
राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिली डेडलाईन; ‘या’ तारखेपर्यंत भोंगे उतरवा अन्यथा…
पांढरी साडी नेसलेल्या ऐश्वर्याने जेव्हा भर सभेत केली होती सासूची मदत, लोकं म्हणाले, बेस्ट ‘सासू-सुन’
एकेकाळी जेवण करायला नव्हते पैसै आणि राहायला नव्हते घर, आज करोडोंचा मालक आहे ऋषभ पंत