ALTBalaji वर प्रसारित होणारा लॉक अप शो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. नुकतेच या शोमध्ये मुनव्वर फारुकीशी संबंधित रहस्य उघड झाले आणि आता इराणी अभिनेत्री मंदाना करीमीने शोमध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे. या शोमध्ये मंदाना तिच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलली आहे.
हे गुपित उघड करताना तिने सांगितले की, महिला हक्कांबद्दल बोलणाऱ्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत तिचे अफेअर होते पण जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा त्याने तिची साथ सोडली. या तिच्या खुलाशानंतर खळबळ उडाली आहे. आता मंदाना करीमीच्या खुलाशाची क्लिप सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. व्हिडिओमध्ये, शोची होस्ट, कंगना रणौत स्पर्धकांना त्यांचे रहस्य विचारते, त्यानंतर मंदाना म्हणाली, त्यावेळी मी माझी परिस्थिती आणि माझ्या पतीपासून वेगळे होणे यात संघर्ष करत होते.
तेव्हा माझे सिक्रेट रिलेशनशिप होते. महिला हक्कांवर बोलणाऱ्या आणि त्यांच्यासाठी लढणाऱ्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत मी रिलेशनशिपमध्ये होते. अनेक महिलांसाठी ते एक आयडॉल होते. त्याने मला गर्भवती केले आणि नंतर तो त्याच्या जबाबदाऱ्या झटकून मला सोडून गेला.
या सगळ्याने माझे खूप काही उद्ध्वस्त केले. मंदाना करीमीने तिचे गुपित उघड केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. जरी मंदानाने तिच्या बाजूने कोणत्याही दिग्दर्शकाचे नाव घेतलेले नाही. पण अनुराग कश्यप आणि तिच्यामधली जवळीक पाहता लोक आपापले अंदाज बांधत आहेत.
मंदाना ज्या दिग्दर्शिकेबद्दल बोलत आहे तो दुसरा कोणी नसून अनुराग कश्यप असल्याचे यूजर्सचे म्हणणे आहे. नेटकरी अनुराग कश्यपच्या पोस्टवर जाऊन कमेंट करत आहेत की, भाई, अनुराग कश्यप, आशा आहे की मंदाना करीमी तुमच्याबद्दल बोलत नाहीये. जर तुम्हीच तो व्यक्ती असाल तर मला आशा आहे की तुम्हालाही मंदानाप्रमाणेच परिस्थितीचा सामना करावा लागेल.
2020 मध्ये अभिनेत्री पायल घोषने अनुरागवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी करीमीनेही अनुरागला पाठिंबा दिला. अनुरागने गमावलेली आशा कशी मिळवली आणि त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश कसा आणला हे त्याने सांगितले होते. करीमीने आपल्या पोस्टमध्ये अनुरागला गार्डियन एंजल म्हणत त्याचा बचाव केला होता.
https://twitter.com/Sharanyashettyy/status/1513196841781051392?s=20&t=iP_LNPsGFkP3G3r65G5Tfg
महत्वाच्या बातम्या
विद्यार्थ्यांसमोर नवं टेन्शन! कोरोना काळात पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्याव्या लागणार
तु माझी आहे अन् माझीच राहणार; आलियाच्या प्रियकराने लग्न थांबवण्यासाठी उचलले टोकाचे पाऊल
महाराष्ट्र हादरला! पतीने पत्नीच्या डोक्यात घातली कुदळ, पोटच्या पोराला फासाला लटकावले; दोघांना मारून नंतर…
महाराष्ट्र हादरला! पतीने पत्नीच्या डोक्यात घातली कुदळ, पोटच्या पोराला फासाला लटकावले; दोघांना मारून नंतर…






