Share

या जन्मात करतो ते याच जन्मात फेडावं लागतं; बरोबर झालं, अजून दगडं मारायला पाहीजे

pawar

शुक्रवारी दुपारच्या सुमारास एसटी कर्मचाऱ्यांनी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाचे आता राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून या प्रकाराचा निषेध करण्यात येत आहे.

या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले. पवारांच्या घरावरील हल्ल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यासह भाजपा नेत्यांनीही निषेध केला. या हल्ल्यामागे कोण आहेत ते शोधून काढा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. भाजप नेत्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पवार यांच्या घराबाहेर केलेल्या हिंसक आंदोलनाचं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी समर्थन केलं आहे. बरोबर झालंच पाहिजे, करायलाच पाहिजे, अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार झाला, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी शरद पवारांना टोलाही लगावला आहे.

‘कर्म असतं ना.. कर्म.. जे आपण या जन्मी करतो ना.. प्रत्येक जण.. मला लागू होतं तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं. त्यातून सूट कोणाला नाही. जे आपण या जन्मी करतो ते याच जन्मी आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने फेडावं लागतं. अजून काय बोलणार..’ असे उदयनराजे यावेळी म्हणाले.

दरम्यान, प्रत्येकाने सोयीप्रमाणे मतांची पेटी बनवली आहे. समाजासमाजात तेढ निर्माण केले जात आहेत. महाराजांच्या नावावर शिवसेनेची स्थापना झाली. मात्र त्यांनीही सर्व लोकांना एकत्र ठेवण्याचा विचार केला नाही. महाराजांचा विचार आचरणात का आणत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘माझं मत ठाम आहे. जे योग्य ते मी मांडत असतो. मूठभर लोकांचा स्वार्थ साधायचा. मूठभर लोकांची प्रगती करायची हे सुरू आहे, असंही उदयनराजेंनी सांगितले. तसेच कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या प्रगतीला उत्तर देणारी असेल असंही उदयनराजेंनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या
‘या’ पर्वतावर अजूनही आहे भगवान शंकराचे वास्तव, दिवसरात्र येत असतो ओम असा आवाज, वाचून आश्चर्य वाटेल
घृणास्पद! चार शिकऱ्यांनी जंगलात घुसून केला ‘या’ मुक्या प्राण्यावर बलात्कार, व्हिडीओही काढला
राम गोपाल वर्मांना होता बाहेरच्या बायकांचा नाद, पत्नीला कळताच प्रसिद्ध अभिनेत्रीला दिला होता चोप
असंभवमधील शुभ्रा तब्बल १२ वर्षांनंतर करतीये ‘या’ मालिकेतून कमबॅक, पुन्हा दिसणार कोठारेंच्या सुनेचा जलवा

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now