Share

राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेला धक्का; पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले होते. त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली होती. तसेच मशिदींवरील भोंग्यांबाबतही भाष्य केले होते. (after raj thackeray statement mns leader resign)

राज ठाकरेंच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. असे असतानाच आता पुण्यातून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यातील मनसेच्या एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.

मशिदींवर लावलेले भोंगे काढले नाही, तर त्याच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनूमान चालिसा लावू, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी मनसेने हनूमान चालिसा लावली. त्यामुळे पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ शाखेचे अध्यक्ष अमीन शेख यांनी राजीनामा दिला आहे.

मागील काही दिवसांपासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना धर्मावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत आहे, अशी माहिती अमीन शेख यांनी दिली आहे. तसेच अमीन शेख यांच्यानंतर अनेक मुस्लिम कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ मेळावा घेण्यात आला होता. या भाषणात बोलत असताना राज ठाकरेंनी मशिदीच्या बाहेर लावण्यात येणाऱ्या भोंग्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदींवरील भोंगे खाली उतरवावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय घेतला नाही, तर मशिदींसमोर हनूमान चालिसाचे स्पीकर लावले जातील, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला होता.

महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांनी कितीवेळा रंग बदललेत?; भाजपने इतिहासाचे थेट दाखले केले सादर
मुंबई पालिकेत इतिहासाची पुनरावृत्ती होणार; रामदास आठवलेंनी केले मोठे विधान, म्हणाले…
PHOTO: उर्फी जावेदने छोट्या आकाराच्या कापडाने बनवला असा टॉप, काहींना आवडला तर काहींना आला राग

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now