विना हेल्मेट पेट्रोल देणं ठरणार गंभीर गुन्हा; या कलमाअंतर्गत पंपचालकांवरच होणार कठोर कारवाई

राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन वेगवेगळे निर्णय घेताना दिसून येत आहे. असे असतानाच आता नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीची मोहिम अत्यंत कठोर पद्धतीने सुरु केली आहे. (giving without helmet petrol is crime)

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहर पोलिस आयुक्त हेल्मेट सक्तीची मोहिम अत्यंत कठोरपणे राबवली जाणार आहे. तसेच विनाहेल्मेट दुचाकी चालकांना पेट्रोल दिल्यास पेट्रोल पंपच्या मालकावर थेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे.

पोलीस आयुक्तांच्या या इशाऱ्यावर पेट्रोल पंपचालकांनी संताप व्यक्त केला आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमबलबजावणी करण्याची जबाबदारी पेट्रोल पंपचालकांची आहे का? असा सवाल पंपचालकांनी उपस्थित केला आहे.

तसेच दुचाकी चालकासह त्याच्यासोबत असलेल्या सहप्रवाशालाही हेल्मेटचा वापर बंधनकारक राहणार आहे. तसेच जर त्याने हेल्मेट घातले नसेल, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असेही दीपक पांडे यांनी म्हटले आहे.

नाशिकमध्ये गेल्या वर्षीपासून नो हेल्मेट-नो पेट्रोल अशी मोहित राबवण्यात आली आहे. या समुपदेशनाला बंधनकारक करत या पद्धतीने पोलीस आयुक्तालयाने हेल्मेटची सवय आणि शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. तसेच ई-चलनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली.

१ डिसेंबर २०२१ पर्यंत २,८७९ दुचाकी चालक व सहप्रवाशांचे समुपदेशन करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण मागील महिन्यापासून या मोहिमेत काहीशी शिथिलता आली आहे. त्यानंतर समुपदेशन थांबवून केवळ दंड वसुलीवर पोलिसांनी लक्ष केंद्र केले होते. आता गुढीपाडव्यापासून पुन्हा हेल्मेट सक्तीची मोहिम अधिक कठोरपणे आणि प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
नाद करा आमचा कुठं! शेतकऱ्याने पिकांच्या रक्षणासाठी अस्वल ठेवलं नोकरीवर, महिन्याला देतो ‘एवढा’ पगार
‘… त्यामुळे महाराष्ट्रातील अजान आम्ही बंद करणारचं’, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
पुणे हादरलं! १७ वर्षीय अभिनेत्रीवर अश्लील व्हिडीओ बनवून दिग्दर्शकाने केला बलात्कार