१९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि काश्मीर खोऱ्यातून त्यांचे झालेले पलायन यावर बनवलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट लोकांना प्रचंड आवडत आहे. हा चित्रपट पाहून प्रेक्षक खूप भावूक होताना दिसून येत आहे. चित्रपटातील काही दृश्ये इतकी वेदनादायक आणि मानवतेला लाजीरवाणी आहेत की ती पाहूनही लोकांना आपले अश्रू आवरता येत नाहीत. (bk ganju real incident in kashmir files)
असेच एक दृश्य चित्रपटात दाखवण्यात आले आहे ज्यात एका काश्मिरी पंडिताच्या निर्घृण हत्येनंतर दहशतवादी त्याच्या विधवा पत्नीला रक्ताने भिजलेला भात खायला लावतात. या दृश्याच्या वास्तवावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशात ज्या काश्मिरी पंडिताची कहाणी सांगितली जात आहे, त्याच्या भावाने या दृश्याच्या सत्यावर भाष्य केले आहे.
असे म्हटले जात आहे की चित्रपटात दाखवलेले हे दृश्य बाल कृष्ण गंजू (बीके गंजू) यांचे आहे. ते काश्मीरमधील इंजिनियर होते. बीके गंजू यांचा भाऊ शिबन कृष्णा गंजू यांनी ‘दैनिक भास्कर’शी बोलताना याबाबत माहिती दिली. शिबनने सांगितले की, ३२ वर्षांपूर्वी ही घटना घडली तेव्हा बीके गंजू ३५ वर्षांचे होते.
तसेच बीके गंजू हे काश्मीरमध्ये एमटीएनएलमध्ये काम करत होते. तसेच ते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होते. आजही डोळे मिटले की काश्मीरचे ३२ वर्षांचे रक्तरंजित दृश्य डोळ्यांसमोर येते. ते खुप भयानक होते. आपला जीव वाचवण्यासाठी लोकांना पलायन करावे लागले होते, असे शिबनने सांगितले आहे.
बीके गंजूच्या हत्येची चर्चा सुरू असताना शिबनने सांगितले की, हत्येच्या दिवशी त्याचा भाऊ ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता. तो घराच्या वरच्या मजल्यावर होता. त्यानंतर ४ जण जबरदस्तीने घरात घुसले. जेव्हा त्यांना माझा भाऊ सापडला नाही तेव्हा शेजाऱ्यांनी दहशतवाद्यांना सांगितले की ते वरच्या मजल्यावर लपले आहेत.
शिबनने पुढे सांगितले की, तो तांदळाच्या ड्रममध्ये लपला होता आणि दहशतवाद्यांनी त्याच्या छातीत ८ गोळ्या झाडल्या आणि त्याची हत्या केली. बीके गंजू यांना मारल्यानंतर त्यांची पत्नी आणि मूल तिथेच होते, पण दहशतवाद्यांनी त्यांना तिथेच सोडून दिले.
बीके गंजूच्या पत्नीला रक्ताने माखलेला भात खाऊ घालत असल्याच्या दृश्याबाबत शिबनला विचारले असता, त्याने सांगितले की, मला अशा कोणत्याही गोष्टीची माहिती नाही. शिबनने सांगितले की, त्याच्या वहिणीने याबाबत काहीही सांगितले नाही.
पुढे तो म्हणाला की, हे घडले असते तर वहिणीने नक्कीच सांगितले असते, पण तसे त्यांनी मला काही सांगितले नाही. शिबनने सांगितले की, चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी त्याला सांगितले की त्याच्या भावाच्या हत्येची कथा दाखवण्यात आली होती, परंतु चित्रपटाच्या दिग्दर्शकाने किंवा त्याच्या टीमने गंजूच्या कुटुंबाशी कधीही संपर्क साधला नाही.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ मध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट सुपरहिट झाला असून २०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाची लोकप्रियता पाहता अनेक राज्यांमध्ये तो करमुक्त करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
IPL सुरु होताच जिओने आणला जबरदस्त प्लॅन, आता फुकटात बघा संपूर्ण IPL
आतापर्यंत फक्त १२ चित्रपट केले, तरीही कोट्यवधींचे मालक आहेत एसएस राजामौली; संपत्तीचा आकडा जाणून बसेल धक्का
आयपीएल सुरू होण्याआधीच राडा! ‘या’ संघात अंतर्गत वाद भडकला; कर्णधारानेच केली…