द काश्मीर फाइल्स पाहून महिलेने केलं असं काही की दिग्दर्शकही झाला भावूक; म्हणाला, माझ्याकडे शब्दच नाहीये…

द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने लोकांची मने हेलावली आहेत. लोक हा चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून नाही, तर भावनिकदृष्ट्याही पाहत आहेत. रात्री उशिरापर्यंत चित्रपटगृहे तुडुंब भरलेली असून चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्यांचे डोळे पाणावले दिसून येतात. (the kashmir files blood poster)

अशात चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपल्या भावना प्रदर्शित करत असतो. कुणी लिहून, कुणी गाऊन, कुणी सोशल मीडियावर. त्याचप्रमाणे एका महिला कलाकाराने द काश्मीर फाइल्सचे पोस्टर स्वतःच्या रक्ताने बनवले आहे.

असे म्हणतात की, जर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्हाला जे सर्वात जास्त आवडते तेच करा, जी तुमची आवड आहे. कवी कविता लिहितो, लेखक कथा रचतो. तसेच कलाकार मंजू सोनी हिने द काश्मीर फाइल्सचे संपूर्ण पोस्टर स्वतःच्या रक्ताने बनवले आहे. पण या पोस्टरमधील प्रत्येक चित्र स्वतःची कथा बनवताना दिसत आहे. प्रत्येक पात्र बोलताना दिसत आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले आहे की हे देवा.. अविश्वसनीय. मला काय बोलावे कळत नाही? मंजू सोनी यांचे आभार कसे मानायचे. माझ्याकडे शब्दच नाहीये. धन्यवाद मंजू जी. जर कोणी त्याला ओळखत असेल तर कृपया मला त्याचा नंबर पाठवा.

बांसकुळी येथील रहिवासी असलेल्या मंजू सोनी या ललित कला संस्था चालवतात. सुमारे २५ वर्षांपासून त्या मुलांना चित्रकला शिकवण्याचे काम करत आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल खूप चर्चा ऐकल्या होत्या, त्यानंतर त्यांना हा चित्रपट पाहण्याची खूप इच्छा होती.

जेव्हा मी चित्रपट पाहिला तेव्हा माझ्यावर मनावर त्याचा खुप परीणाम झाला आणि मला त्याचे पोस्ट तयार करावेसे वाटले. मी हजारो चित्रे काढली आहेत, पण या चित्रपटात जे काही पाहिलं त्यावरून मला काहीतरी नवीन करण्याची कल्पना आली. माझे १० मिली रक्त काढण्यात आले आणि त्या रक्ताने द काश्मीर फाईल्सची सात मुख्य पात्रे शीटवर मी कोरली आणि त्याला पोस्टरचे स्वरूप दिले गेले, असे मंजू यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
द फॅमिली मॅन 3 मध्ये असणार जबरदस्त ससपेन्स, मनोज वाजपेयी यांनी दिली ‘ही’ महत्वाची अपडेट
मला तुरुंगात टाका मी जायला तयार आहे, पण कुटुंबाची बदनामी कशाला करताय? मुख्यमंत्री संतापले
कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीला संघात जागा मिळणं कठीण? रवींद्र जडेजाने निवडले प्लेइंग ११