‘द कपिल शर्मा शो’ हा टेलिव्हिजनवर सर्वाधिक टीआरपी असलेला शो आहे. या शोमध्ये दर आठवड्याला नवीन पाहुणे येतात, ज्यामुळे प्रेक्षकांना हास्याचा दुहेरी डोस मिळतो. शोमध्ये कपिल शर्मा स्वतः किकू शारदा, कृष्णा अभिषेक, भारती सिंग, जेमी लीव्हर, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरण सिंग सोबत प्रेक्षकांना हसवतो.
आता बातम्या येत आहेत की हा शो काही दिवसांसाठी बंद होणार आहे. यामुळे कपिल शर्मा शो च्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पण काळजी करण्यासारखे काही कारण नाही कारण हा शो फक्त काही काळासाठी बंद होणार आहे जो पुन्हा चालू होणार आहे. साधारण एक महिन्यासाठी हा शो बंद होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द कपिल शर्मा शो’ कलाकारांच्या इतर वचनबद्धतेमुळे लवकरच एक छोटा ब्रेक घेईल, परंतु लवकरच नवीन सीझनसह परत येईल. कपिलने अलीकडेच यूएसए आणि कॅनडा दौरा जाहीर केला, जो जूनमध्ये सुरू होईल आणि जुलैच्या सुरुवातीपर्यंत संपेल. अशा परिस्थितीत संपूर्ण टीम त्यात व्यस्त असणार आहे.
याशिवाय त्याच्याकडे आणखी काही कामाच्या कमिटमेंट्स आहेत. त्यामुळे कपिलने शोमधून छोटा ब्रेक घेऊन काही महिन्यांनी नवीन सीझन घेऊन परतण्याचा निर्णय घेतला. सध्या कपिल शर्मा नंदिता दासच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून भुवनेश्वरहून परतला आहे. या चित्रपटात कपिल शर्मासोबत शहाना गोस्वामीही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
कपिल शर्माने ओडिशात खूप धमाल केली. तो अलीकडेच पुरीच्या जगन्नाथ मंदिर आणि कोणार्क सूर्य मंदिरात फिरण्यासाठी गेला होता ज्याचे फोटो त्याने सोशल मिडीयावर शेअर केले होते. अभिनेत्याने सूर्य मंदिराजवळील एक सुंदर फोटोदेखील सोशल मिडीयावर शेअर केला होता जो झपाट्याने व्हायरल झाला होता.
याशिवाय कपिलने गेल्या आठवड्यात भुवनेश्वरमध्ये बाईक चालवतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या फोटोला त्याने कॅप्शन दिले होते की, माझ्या आवडत्या बाइकवर सकाळच्या राइडचा आनंद घेत आहे. #bullet #bulletlovers #beautiful #bhubaneswar #odisha” असे हॅशटॅग्स त्याने दिले होते.
महत्वाच्या बातम्या
टाटा समूहाचा ‘हा’ स्टॉक झाला सुपर रॉकेट; एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला 1000 टक्के परतावा
ठाकरे सरकारला दणका! परमबीर सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
एकता कपूरच्या ३ वर्षीय मुलाने थेट स्मृती इराणींसाठी लिहीली खास नोट, म्हणाला, प्रिय स्मृती मावशी..
पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; 6 जणांनी कोयत्याने वार करत तरुणाचा केला खेळ खल्लास, घटनेचा LIVE व्हिडिओ