इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) गुरुवारी मोठा फेरबदल करण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या जागी आता रवींद्र जडेजाकडे कमान सोपवण्यात आली आहे. धोनी एक खेळाडू म्हणून संघासोबत खेळत राहील. चेन्नई संघाने जडेजा आणि धोनीसह 4 खेळाडूंना कायम ठेवले होते.
जडेजाला फ्रँचायझीने 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. तर धोनीला या मोसमात केवळ 12 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले होते. यावरून जडेजाला कर्णधार बनवता येईल, असा अंदाज सुरुवातीपासूनच वर्तवण्यात येत होता. त्याच्याशिवाय मोईन अलीला 8 कोटी आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटींसाठी कायम ठेवण्यात आले आहे.
33 वर्षीय जडेजा 2012 पासून चेन्नई संघासोबत आहे. तो CSK संघाचा तिसरा कर्णधार असेल. महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून म्हणजेच 2008 पासून संघाचे नेतृत्व करत होता. 213 सामन्यांमध्ये कर्णधार असताना धोनीने 130 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.
यादरम्यान सुरेश रैनाने 6 सामन्यात कर्णधारपद भूषवले असून, त्यापैकी केवळ 2 सामन्यात संघ जिंकला आहे. 2008 मध्ये लीग सुरू झाल्यापासून 40 वर्षीय धोनी चेन्नईचा कर्णधार आहे आणि ही त्याची शेवटची आयपीएल असू शकते. त्याने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
सुनील गावसकर यांनीही कबूल केले होते की, ‘रवींद्र जडेजा एक खेळाडू म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये परिपक्व झाला आहे, त्याच्या खेळाच्या बाबतीत त्याने अनेक बदल केले आहेत आणि तो सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळतो आहे. हे आश्यर्यकारक आहे. चेन्नई व्यवस्थापनाने आयपीएलला सुरुवात होण्याच्या दोनच दिवस आधी कर्णधारपदात मोठ्या फेरबदलाचा निर्णय घेतला आहे.
26 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ यावेळी आपले जेतेपद वाचवण्याच्या आणि ५वे विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
धोनीने दिला धक्का! चेन्नईचं कर्णधारपद सोडलं, यापुढे ‘हा’ पठ्ठ्या सांभाळणार कर्णधारपद
सौंदर्यामध्ये सगळ्या अभिनेत्रींना तोड देते तेरे नाममध्ये भिकारी दिसणारी ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटो
‘सुर्यवंशम’मधला छोटा हिरा ठाकूर आठवतोय का? २२ वर्षांनंतर ओळखणंही झालंय कठीण, पहा फोटो
पत्नीचे लफडे पतीने हसत हसत केले माफ, पण ठेवली ही अट; वाचून धक्का बसेल