सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातल्या काही गोष्टी या ऑप्टिकल इल्युजनने भरलेल्या असतात. काही इल्युजन हे गुंतवून ठेवणारे असतात. एवढेच नाही, तर प्रसिद्ध हॅरी पॉटरचे लेखक जेके राउलिंग यांनीही एक ऑप्टिकल इल्युजन फोटो शेअर केला होता. ते पाहून सगळेच हैराण झाले होते. (horse optical illusion video)
आताही एका घोड्याचे इल्युजन इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हे व्हायरल इल्युजन युट्युबवर अपलोड करण्यात आले आहे. हे पाहून असे वाटते की, यातील घोडा नक्की कोणत्या दिशेला फिरत आहे? हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहे.
हा व्हिडिओ पाहून असे वाटते की, घोडा क्लॉकवाइज फिरतोय, की अँटी क्लॉकवाइज? हा व्हिडिओ पोस्ट करताना, हा घोडा कोणत्या दिशेला फिरत आहे? उजवीकडे की डावीकडे? असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा ऑप्टिकल इल्युजन असलेला व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका नेटकऱ्याने म्हटले की, पाय बघा, आपल्याला उत्तर मिळून जाईल की, हा घोडा कोणत्या दिशेने फिरत आहे. आणखी एका नेटकऱ्याने लिहिली आहे की, तो घडाळ्यासारखा फिरत आहे. हे पाहण्यासाठी अस्पष्ट दृष्टीने पाहा. यावर असलेल्या डॉट्समुळे तो दोन्ही बाजूंनी फिरताना दिसतो.
हा व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वी एका युट्युबरने त्याच्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला होता. आतापर्यंत ५३ हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. तसेच याचं उत्तर सांगण कठिण असल्यामुळे फक्त ४३ लोकांनाच याचं उत्तर देता आलं आहे. सध्या हा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे.
ऑप्टिकल इल्युजनला मराठीत दृश्यभ्रम म्हणतात. त्याला सोडवण्यासाठी खुप कस लागतो. तसेच फक्त एक वेळा बघितल्यामुळे नक्की काय होतंय हे आपण सांगू शकत नाही, पण २-३ वेळा नीट निरखून बघितले तर आपण त्यात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच देऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या-
अशक्तपणा, चालणंही झालं कठीण, वाढत्या वयामुळे धर्मेंद्रची झाली वाईट अवस्था; फोटो पाहून बसेल धक्का
अमिताभ बच्चनमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचे पतीसोबत झाले होते भांडण; पतीनेच केला धक्कादायक खुलासा
पंतप्रधान मोदींना शिव्या देणाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी चाटायला लावली थुंकी, व्हिडीओ व्हायरल