Share

‘द काश्मीर फाइल्स’ने बॉलिवूडचा नाश केला; राम गोपाल वर्मांचा विवेक अग्नीहोत्रीवर घणाघात

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची देशात असो वा परदेशात सर्वत्र चर्चा आहे. कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर झेंडा रोवला आहे. हा चित्रपट ९० च्या दशकात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या कथेवर आधारित आहे. (ram gopal varma on ghe kashmir files)

या चित्रपटाचे देशभरातून खूप कौतुक होत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यावर अनेक कलाकार वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अशात प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही त्यांच्या खास शैलीत या चित्रपटाचे कौतुक केले आहे. राम गोपाल वर्मा म्हणाले की, विवेक अग्निहोत्रीने हा चित्रपट बनवून चित्रपट निर्मात्यांच्या नवीन जातीला प्रेरणा दिली आहे. या चित्रपटाने बॉलीवूडचा नाश केला, असे राम गोपाल वर्मा म्हणाले.

राम गोपाल वर्मा म्हणाले की, या चित्रपटानंतर बॉलीवूड दोन भागांमध्ये विभागले जाईल, एक द काश्मीर फाइल्सच्या आधी आणि दुसरा या चित्रपटानंतर. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटात अनेक समज मोडले आहेत.

राम गोपाल वर्मा यांच्या मते, या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नव्हता, असे असूनही चित्रपट हिट झाला, म्हणजेच चित्रपट हिट होण्यासाठी मोठ्या स्टारची गरज नाही. तसेच हिट चित्रपटासाठी मोठे बजेट असणे आवश्यक नसते हे या चित्रपटाने सिद्ध केले.

तसेच चित्रपटाला हिट होण्यासाठी गाण्यांची गरज नसते. एका हिट चित्रपटासाठी मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचीही गरज नसते हे या चित्रपटाने सिद्ध केले. एवढेच नाही तर हा चित्रपट हिट होण्यासाठी प्रमोशनवर लाखो-करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाही, असे राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
करीना कपूरच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था, फोटो पाहून चाहत्यांना देखील बसला धक्का
जगातील सगळ्यात घातक विष साईनाईडची टेस्ट कोणालाच नाही माहिती पण आम्ही तुम्हाला सांगतो, वाचा सविस्तर..
बॉलिवू़डच्या बेबोने समुद्र किनाऱ्यावर साजरी केली आपली होळी; शेअर केला मुलांसोबतचा सेलिब्रेशन व्हिडिओ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now