आजच्या काळात लहान मुलांना समजणे खूप कठीण झाले आहे. ऑनलाइन किंवा टीव्हीवर जास्त वेळ घालवल्यामुळे मुले रागीट होत आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्यांचा राग अनावर येताना दिसून येत आहे. आजच्या काळात पालकही नोकरी करत असल्यामुळे त्यांना मुलांकडे लक्ष देणं शक्य होत नाहीये. (16 year boy kill 11 year boy for 70 rupees)
पालकांना लक्ष देणे शक्य होत नसल्यामुळे मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांची आक्रमकता वाढत जाते. दुसरीकडे, मूल पालकांशिवाय असेल तर परिस्थिती गंभीर बनते. असेच एक प्रकरण मलेशियामधून समोर आले आहे, जिथे एका ११ वर्षाच्या मुलाला त्याच्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलांनी मारहाण केली त्यामध्ये त्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.
शाळेतील या मारहाणीच्या घटनेचे कारण समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. केवळ ७० रुपयांसाठी त्यांच्यात ही हाणामारी झाली होती. सत्तर रुपयांसाठी एका ११ वर्षाच्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मुलाला मारहाण करणाऱ्या मुलांचे वयही १६ वर्षे होते.
आपल्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या मुलाला मारहाण करून हे अल्पवयीन तेथून पसार झाले. मात्र जेव्हा मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
या प्रकरणाची माहिती देताना कुआंतन जिल्हा पोलीस प्रमुख एसीपी वन मोहम्मद झहरी वान बुसू यांनी सांगितले की, ही घटना कुआंतन येथील कल्याण गृहातील आहे. येथे राहणारी ६ मुले मशिदीची साफसफाई करत होती. त्यानंतर ते ७० रुपयांवरुन आपापसात भांडू लागले.
सत्तर रुपयांच्या वादातून दोन १६ वर्षांच्या मुलांनी आपल्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या मुलाला इतके मारले की तो बेशुद्ध झाला. यानंतर त्यांनी तेथून पळ काढला. काही वेळाने स्थानिकांना मशिदीबाहेर एक मूल बेशुद्ध पडलेले दिसले. सुरुवातीला त्यांना वाटले की मुलाला चक्कर आली असावी. त्यामुळे त्याला ताबडतोब तेंगकू अफझान रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगितले.
त्यानंतर तातडीने मुलाला इमर्जन्सी वॉर्डमध्ये हलवण्यात आले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. सत्तर रुपयांच्या भांडणात मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आता पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
कर्ज फेडण्यासाठी बनली सरोगेट आई, शस्त्रक्रियेनंतर जडला जीवघेणा आजार; आता मोजतीय शेवटच्या घटका
माधूरी दीक्षितने आलिशान घर घेतलं भाड्याने; महिन्याचं भाडं ऐकून डोळे होतील पांढरे
‘पार्थ पवार हेलिकॉप्टरने फिरण्या पलीकडे काही करत नाही, हा पुण्याचा पेंग्विन,’ भाजपाची जहरी टीका