एमआयएमनं आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची ऑफर दिली आहे. इम्तियाज जलील यांच्या घरी सांत्वन भेटीसाठी गेलेल्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामध्ये चर्चा झाली. यात आपला निरोप पवारांपर्यंत पोहोचवण्याची विनंती जलील यांनी केली होती.
त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच अनेक दिवसांपासून राणे पिता – पुत्र ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहे.
आता पुन्हा एकदा भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना राणे यांची जीभ घसरली असून त्यांनी तुळजापूर मंदिराच्या आवारातच अश्लील विधान केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा चांगलेच चर्चेत आले आहेत. तर जाणून घेऊया ते नेमकं काय म्हणाले.
ते म्हणाले, ”एमआयएमने महाविकास आघाडीतील तीन पक्षांना लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी लग्न आणि हनीमून करावा की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या घरातील हा विषय आहे”, असं राणे म्हणाले. त्यानंतर त्यांनी अतिशय अश्लील विधान केल्याची माहिती माध्यमांमधून मिळत आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.शिवसेनचं हिंदुत्व महाराष्ट्राभर पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेश देखील ठाकरे यांनी खासदारांना दिले आहेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं.
महाविकास आघाडीत शिवसेना असल्यानं सर्वांचं लक्ष सरकारच्या भूमिकेकडं लागलं होतं. याबाबत संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी आघाडीची शक्यता नाकारली. औरंगजेबापुढं झुकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका संजय राऊतांनी जाहिर केली.
महत्त्वाच्या बातम्या
चीनचे विमान १३३ प्रवाशांसह डोंगराळ भागात कोसळले; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर
राजस्थान हायकोर्टाने सलमानला दिला सर्वोच्च दिलासा, सलमानची बहिण अलवीराही मुंबईला परतली
‘बीफ खाणारा प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत ज्ञान देत आहे?’, होळीला ‘हा’ संदेश दिल्याने रोहित शर्मा ट्रोल
‘या’ व्यक्तीमुळे झालं राणी मुखर्जी आणि अभिषेकचं ब्रेकअप, नाहीतर आज असती बच्चन कुटूंबाची सून