एकीकडे भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे तर दुसरीकडे ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांपर्यत निरोप पोहोचवा अशी विनंती केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने जलील यांना थेट ऑफर दिली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लासलगाव तालुक्यातील विंचूर येथे बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत भाष्य केले आहे. ‘खरे तर इम्तियाज जलील हे ‘एमआयएम’चा राजीनामा देऊन आले, तर त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. नक्कीच पवार साहेब त्यांना राष्ट्रवादीत घेतील, असे आवाहन भुजबळ यांनी केले.
याबाबत बोलताना ते म्हणाले, जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणं काम करावं. शरद पवार साहेब त्यांना नक्की घेतील, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. महाविकास आघाडीची सत्ता पाच वर्ष टिकणार आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना एमआयएमसोबत उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही हे स्पष्ट केले आहे. ‘औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? तुम्ही विचारच कसा करू शकता? असा विचार करणंच एक आजार आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे. चौथा त्यात येणार नाही. तीनच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
पुणे हादरलं! गेल्या चार वर्षांपासून वडील, भाऊ, आजोबा, मामा करत होते ११ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार
काश्मीर फाईल्सची रेकॉर्डब्रेक कामगिरी, आमिर खानच्या दंगलला मागे टाकत बाहुबली २ ला दिली टक्कर
..आणि डोळ्यादेखत मामेबहिणीसह भावाचा धरणात बुडून मृत्यू, पुण्यातील दुर्दैवी घटना
मराठी बिग बॉस विनर विशाल निकमचे नशीब पुन्हा चमकले, ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला