Share

आजोबांच्या निधनाने भावूक झाली प्राजक्ता गायकवाड, म्हणाली, ‘सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात’

प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांसारखेच त्यांच्या आजी आजोबांचेही तितकेच महत्व असते. लहाणपणी आपण आपल्या आजी आजोबांसोबत जे काही क्षण घालवतो ते न विसरणारे असतात. लहान मुलं गावाकडं गेली की ती आपल्या आजी आजोबांकडेच जास्तवेळ असतात त्यामुळे लहान मुलांसोबत मोठ्यांचेही त्यांच्यासोबत एक अतुट नाते असते.

हेच नाते जेव्हा तुटते किंवा ते आपल्यापासून दूर जातात तेव्हा ते दुख सहन करणे खुप कठीण असते. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचेही आपल्या आजोबांसोबत अतुट नाते होते पण तिच्या आजोंबाचे निधन झाले आहे आणि ती सध्या खुप दुखात आहे. तिने फेसबूकला पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

आजोबांबद्दल असलेले आदर, प्रेम, जिव्हाळा तिने आपल्या पोस्टमधून व्यक्त केले आहे. तिची ही पोस्ट पाहून अनेक जण भावूक झाले आहेत. प्राजक्ता गायकवाडने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, आजोबा…. आता कोण बैलगाडी जुंपणार ? आता कोण माझे लाड करणार ? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार ? अभंग म्हणणार ? शिस्तप्रिय पण मनमिळावू स्वभाव…

सगळ्या गावात रुबाब आणि धाक असायचा, येणाऱ्या प्रत्येकाची चेष्टा मस्करी करून बोलणं…. तुकारामाची नात म्हणजे आपली येसूबाईंची भूमिका करणारी म्हणून पूर्ण गावात, तालुक्यात चर्चा….माझी नात म्हणून अभिमान बाळगणारे… शेवटपर्यंत स्वाभिमानानं , ताठ मानेनं जगलात…सगळं आयुष्य कष्टानं जगलात.

वारकरी संप्रदायात रमणारे, प्रत्येक सप्ताहात वीणा धरणारे, मला लहानपणापासून हरिपाठ , ज्ञानेश्वरी,गाथा आणि संपूर्ण भागवत संप्रदाय शिकवणारे लाडके आजोबा…… कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत, पण हे नातं खूप अतूट होतं आणि कायम राहील.

देवाच्या मनात काय आहे याचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही, रात्री serial बघून एकत्र जेवण करून सकाळी आपण morning walk ला जाऊ असं म्हणून सोडून गेलात आजोबा….. मन अगदी सुन्न झालंय……परत या आजोबा….भावपूर्ण श्रद्धांजली, अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे. तिची ही पोस्ट वाचून अनेक चाहते भावूक झाले आहेत. अनेकांनी तिच्या आजोबांना श्रद्धांजली वाहिली आहे.

https://www.facebook.com/100044434778524/posts/522722052552283/?d=n

महत्वाच्या बातम्या
काश्मिर फाईल्सने दुसऱ्या दिवशीही केली छप्परफाड कमाई, प्रभासच्या ‘राधे-श्याम’लाही टाकले मागे
४ वर्षांची घोर तपस्या, ५ हजार तासांचा रिसर्च आणि ७०० पीडितांच्या मुलाखती; वाचा कसा बनला द काश्मीर फाइल्स
मोठी संधी! ‘या’ दोन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, दोन आठवड्यात होईल मोठी कमाई, तज्ञांचा सल्ला
नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटामुळे कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत, प्रेक्षकांकडून बहिष्काराची मागणी

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now