भारतात आणि जगभरात गेल्या अडीच वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या करोना विषाणूचं अस्तित्व गेल्या काही दिवसांमध्ये उरलंच नसल्याचा समज निर्माण व्हावा अशी परिस्थिती आसपास दिसू लागली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता.
मात्र कोरोना विषाणूचा प्रसार कमी प्रमाणात झाल्याने सरकारने आता नियम शिथिल केले आहे. करोनानं जगात शिरकाव केल्याला आता दोन वर्ष उलटलेत. अनेक देशांत करोनाचा प्रभाव कमी झालेला दिसून येत आहे. याच दरम्यान चीनमधून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येते आहे.
ही बातमी वाचून तुम्हालाही नक्की धक्का बसेल. शुक्रवारी चीनने 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुन या ईशान्येकडील शहरामध्ये लॉकडाउन लावण्याचे आदेश दिले आहेत. या शहरात करोनाच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यासाठी चीन सरकारने हा आदेश दिला असल्याची माहिती मिळत आहे.
2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर या विषाणूचं संपूर्ण जगभर जाळं वेगाने पसरलं. अशातच पुन्हा एकदा चीनमधील नव्या विषाणूनं जगभरात दहशत निर्माण केली आहे. संपूर्ण चीनमध्ये या विषाणूचे एकूण 397 प्रकरणे नोंदवली गेली.
त्यापैकी 98 चांगचुनच्या आसपास असलेल्या जिलिन प्रांतात सापडली आहेत. चांगचुंग शहरात फक्त दोन प्रकरणे आढळून आल्याची माहिती समोर येत आहे. चिनी प्रशासनाने 12 शहरात 1000 पेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद केल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी चीनमध्ये स्थानिक संक्रमणाची आणखी 397 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 98 प्रकरणं जिलिन प्रांतातील आहेत. तर शहरात केवळ दोन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तसेच वाढता प्रादुर्भाव पाहाता चीनमध्ये पहिल्यांदाच रॅपिड अँटिजन टेस्ट सुरु करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
देवेंद्र फडणवीसांच्या घरी मुंबई पोलीस जाणार, चौकशीही करणार; राज्याच्या राजकारणात खळबळ
बच्चू कडूंवर कोसळला दुखाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे झाले निधन; भावूक होत म्हणाले…
‘या’ ५ वर्षाच्या गरीब पोराच्या बॅटींगचा फॅन झाला सचिन; खूष होत स्वत: दिली ५ दिवस ट्रेनिंग
हनिमूनच्या रात्रीच सापडला बायकोच्या बलात्काराचा व्हिडिओ; नवऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल