केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी शरद पवारांना लक्ष केले आहे. यावेळी बोलताना राणे यांनी थेट पवार साहेबच दाऊदचा माणूस असल्याचं म्हंटले आहे. निलेश राणे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश राणेंना पत्रकारांनी मलिकांच्या अटकेसंदर्भात प्रश्न विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला नाही.
यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली असून मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आंदोलने देखील केली आहेत. तर आता निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
निलेश राणे म्हणतात, ‘अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा. मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे, असा संशय मला येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?’
पत्रकार परिषदेत बोलताना असे अनेक प्रश्न राणे यांनी उपस्थित केले. तसेच राणे यांनी सुप्रिया सुळे यांना देखील लक्ष केले. याबाबत बोलताना राणे म्हणतात, “नवाब यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी जेवढी तत्परता दाखवली, तेवढीच काळजी अनिल देखमुखांच्या वेळी कुठे होती?” असा सवाल उपस्थित करत निलेश राणेंनी सुप्रिया सुळेंवरही टीका केली.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून राणे पिता – पुत्र सत्ताधारी नेत्यावर सडकून टीका करत आहे. आता त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतायेत याकडॆ सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच यामुळे राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
फोटोग्राफरचा एक क्लिक आणि ‘त्या’ मुलीचं संपूर्ण आयुष्यच बदललं, वाचा फुगे विकणाऱ्या किसबूची कहाणी
‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट; आशुतोषमुळे अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवीन वादळ
सुख म्हणजे नक्की काय असतं: आरोप करणाऱ्या शालिनी-देवकीला गौरीने थेट दिली धमकी; म्हणाली…
आसाराम बापू निर्दोष आहेत त्यांची सुटका करा; महिलादिनी नांदेडमधील महीलांनी काढला मोर्चा