उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकीचा गोंधळ संपला आहे. या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले आहे. या राज्यांमध्ये पंजाब वगळता सगळीकडे भाजप सरकार निवडून आले आहे. (sanjay raut up rally video viral)
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बहूमत मिळवले आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना २७३ जागा जिंकण्यात यश आले. तर दुसरीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने तीन राज्यांच्या निवडणूकांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोवा या तीन राज्यांमध्ये शिवसेनेने उमेदवार दिले. पण निवडणूक निकालांमध्ये शिवसेनेला मात्र यश आले नाही.
शिवसेनेने तब्बल ६० ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील १९ जणांचा उमेदवार अर्ज बाद झाला. तसेच त्यांच्या एकाही उमेदवाराला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातून त्यांना ट्रोल केले जात आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना नेते संजय राऊतांवर टीका केली आहे.
मनसे नेते अमेय खोपकर यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर टीका केली आहे. त्यांनी संजय राऊतांच्या भाषणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते शिवसेना उमेदवाराला तुम्ही लवकरच मंत्री बनणार आहात, असे म्हणताना दिसून येत आहे.
https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1502143128240750592?s=20&t=9VUHI6fw2OOrDKqN9NUEAg
कधी आयुष्यात निराशा दाटून आली, न्यूनगंड निर्माण झाला तर संजय राउताकडे पहा, आभाळ हेलपायची उर्मी निर्माण नाही झाली तर विचारा. अरे जो सेनेचा उमेदवार युपीमधील पहिला मंत्री होणार होता त्याला तब्बल २२ मत आहेत, असे म्हणत अमेय खोपकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
संजय राऊतांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. संजय राऊतांचा हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधला आहे. ते एका प्रचार सभेदरम्यान उत्तर प्रदेशला गेले होते. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले होते. या व्हिडिओमध्ये संजय राऊत उमेदवाराला म्हणतात की, तुम्ही उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचे पहिले मंत्री होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या आठवड्यात झुंडची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; जमा केला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
आयपीएलमध्ये पदार्पण करताच लखनौ संघाला मोठा झटका, ७.५ कोटींचा ‘हा’ खेळाडू झाला दुखापतग्रस्त
राधे-श्याम पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार? रिलीजपुर्वीच केली इतक्या कोटींची कमाई, तिकीटांचे ऍडव्हान्स बुकींग