देशातील 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींचे निकाल गुरुवारी हाती आले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022 Result) योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाने (BJP) बंपर विजय मिळवला आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 273 जागा जिंकण्यात यश आले.
तर दुसरीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनं देशभरात पाळंमुळं रोवण्याच्या दृष्टीने तीन राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश, मणिपूर आणि गोवा या तीन राज्यांमध्ये शिवसेनेने उमेदवार दिले. पण निवडणूक निकालांमध्ये शिवसेनेचं पानिपत होत आहे.
शिवसेनेने तब्बल शिवसेनेने ६० ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परंतु त्यातील १९ जणांचा उमेदवार अर्ज बाद झाला. पण त्यांच्या एकाही उमेदवाराला चांगली कामगिरी करता आलेली नाही. गोव्यात शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेत्यांकडून शिवसेनेला लक्ष केले जात आहे.
याचाच धागा पकडत भाजप नेते नितेश राणे यांनी खोचक ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राणे ट्विटमध्ये म्हणतात, ‘गोवा राज्यात शिवसेनेला मिळालेले एकूण मतदान – 1718, शिवसेनेची ही कामगिरी बघून पूतीन टेन्शन मध्ये,’ अशी खोचक टीका राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1502126442913546242?s=20&t=Vo9Jp_YNCCwvC-fQ1pPFMQ
दरम्यान, गुरुवारी देखील नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला लक्ष केले होते. “गोवा आणि उत्तर प्रदेशात ‘म्याव-म्याव’चा आवाजच ऐकू आला नाही. खुपच वाईट, अत्यंत दु:ख झालं,” असं म्हणत नितेश राणेंनी खोचक टोला लगावला होता. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं होतं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची एकत्रित मतं जरी बघितली तरी नोटा पेक्षा ती कमी आहेत, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर शिवसेनेकडून संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘भाजपने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापुढे आम्ही कमी पडलो. हे खरं आहे, असे राऊत म्हणाले.
याबाबत माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘आम्हाला नोटांपेक्षा कमी मतं मिळाली कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. तरी उत्तरप्रदेश आणि गोव्यात आम्ही आमच्या पद्धतीने लढलो. ही लढाई सुरू राहील. पंजाबमध्ये भाजप एक राष्ट्रीय पक्ष असूनही पराभूत झाला. याचंही भाजपने उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
अखेर कपिल शर्माने ‘काश्मिर फाईल्स’च्या वादावर सोडले मौन, म्हणाला, आजच्या सोशल मिडीयाच्या जगात..
टॉमेटॉ बॉम्बच्या जीवावर युक्रेन करतोय बलाढ्य रशियावर मात, वाचा नक्की काय आहे टॉमेटो बॉम्ब?
अखेर प्रतीक्षा संपली! मारूतीची स्विफ्ट डिझायर आली सिएनजी व्हेरीयंटमध्ये; किंमत आहे फक्त…
“उंदीर माजला म्हणून तो बैलगाडी ओढू शकत नाही”, गोपीचंद पडळकरांची महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका