“म्हणजे उद्या खाजगीमध्ये आम्ही आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का?” राष्ट्रवादी फडणवीसांवर संतापली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सनसनाटी आरोप केले आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह फडणवीसांनी आरोप केला आहे. पेन ड्राईव्ह सादर करत त्यांनी हे आरोप केले आहे. (Ncp leader angry on devendra fadanvis)

आता माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. अनिल गोटे यांनी फडणवीसांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. फोन टॅपिंगवरुन त्यांनी व्यक्ति स्वातंत्र्यावर घाला घातला असल्याचं म्हटले आहे.

तसेच उद्या आम्ही आमच्या बायकांशी काही खाजगी पण बोलायचं नाही का? असा सवाल अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे. फोन टॅपिंग करायचे काही नियम आहेत की नाही? फोन टॅपिंग मॅन्युप्युलेट केलेलं आहे, असा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.

माझं नाव घेतलं याबाबत मी त्यांचा आभारी आहे. याशिवाय मला त्यांच्याबद्दल बोलताच आलं नसतं. आम्ही कुणाला अडकवण्यासाठी तिथं बसलोय असं फडणवीसांनी म्हटले आहे. माझ्या एका केसबाबत मी तिथे बसलो होतो. चव्हाण नावाचे वकील जे आहेत, ते धुळ्याला सातत्याने येत होते, त्यामुळे त्यांना भेटायला गेलो होतो, असे अनिल गोटे यांनी म्हटले आहे.

तसेच देवेंद्र फडणवीसांना एवढं काय पडलं आहे. तिथे जाऊन शूटींग करायला लावलं. म्हणजे कोणी आपआपसात बोलूही नये. केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. हे देखील यावरुन समोर येत आहे, अशी टीकाही अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

दरम्यान, १२५ तासांच्या या स्टिंगमधील सर्वात महत्वाचा भाग २९ वेगवेगळ्या पेन ड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला आहे. भाजपमधील काही नेते टार्गेटवर असल्याचा आरोपही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
“रात्री मोठ्याने गाणी लावत रस्त्यावर गाड्यांचे स्टंट करणं हे छत्रपतींचे विचार आहेत का?”
तेव्हा लहाणपणी लग्न व्हायची तुमचं अजून झालं नाही, राज ठाकरेंचा कोश्यारींना टोला
वाईडसह क्रिकेटच्या ‘या’ नियमांमध्ये झाले मोठे बदल; झेलबाद झाला तरी फलंदाज..