कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे पदार्थ खाऊन ‘ही’ महिला महिन्याला कमावते तब्बल ७ कोटी, पहा व्हिडीओ

इंटरनेटच्या जगात तुम्हाला एकापेक्षा एक चमत्कार पाहायला मिळतील. इथे लोकांना काही आवडेल याची कल्पनाही करता येत नाही. साधारणपणे, जेवताना आवाज करू नये, मोबाईल चाळू नये किंवा बोलू नये असं अनेक लोक म्हणतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, एक महिला खातानाचे व्हिडीओ काढून करोडो कमावते तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. (lady making money from eating food on camera)

कॅनडामध्ये राहणाऱ्या नाओमी मॅकरेच्या या विचित्र व्यवसायाबद्दल ऐकून सर्वसामान्यांना धक्का बसेल पण हे खरे आहे की जेवताना तिच्या तोंडातून येणारा आवाज ऐकण्यासाठी तिला यूट्यूबवर 7.7 मिलियन लोक फॉलो करतात. सोशल मीडियावर ती हन्नीबी या नावाने प्रसिद्ध आहे.

27 वर्षीय नाओमी मॅकरे ओंटारियोमध्ये राहते आणि या विचित्र व्यवसायातून दरमहा £750,000 कमावते, म्हणजे भारतीय चलनात सुमारे 8 कोटी रुपये. ती काहीही खाते तेव्हा तिच्या तोंडातून येणार आवाज ऐकण्यासाठी सुमारे 80 लाख लोकांनी तिला सब्सक्राईब केले आहे.

या प्रकारच्या व्हिडिओला ASMR म्हणजेच autonomous sensory meridian म्हणतात. त्यामध्ये जेवताना किंवा काहीही खाताना विशिष्ट प्रकारचा आवाज आल्याने लोकांना आराम आणि समाधान वाटते. 2019 मध्ये तिने हे काम सुरू केले आणि तिला इतकं यश मिळालं की तिने फिटनेस करिअर सोडून पूर्णपणे हे काम करायला सुरुवात केली.

नाओमीच्या व्हिडिओचा आवाज ऐकून लोकांना शांत वाटतं आणि जर एखाद्याला झोप येत नसेल तर त्यांना झोप येण्यास मदत होते. नाओमी, जी स्वत: एकेकाळी ASMR व्हिडिओ पाहायची. ती सांगते की तिला ही कल्पना त्याच वेळी सुचली. ती मायक्रोफोनच्या अगदी जवळ बाटली उघडण्याचा, बिस्किट किंवा चॉकलेट खाण्याचा आवाज काढते आणि लोकांना हेच आवाज आवडतात.

सध्या ती वेगवेगळे अन्नपदार्थ खाऊन स्वतःचे व्हिडीओ बनवते आणि एका महिन्यात आरामात 7.5 कोटी रुपये कमावते. यासह ती जगभर फिरत आहे आणि वेगवेगळ्या पदार्थांचे व्हिडीओ बनवत आहे. तिच्या व्हिडीओंना लाखोंमध्ये व्ह्युज असतात. अनेक लोक तिचे व्हिडीओ आवडीने पाहतात.

महत्वाच्या बातम्या
केंद्रीय यंत्रणांच्या वापराशिवाय १२५ तासांचे रेकाॅर्डींग शक्य नाही; शरद पवारांनी केली चौकशीची मागणी
‘तेव्हा लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते; आता कुठे गेला ठाकरी बाणा?’ भाजपाचा संतप्त सवाल
LIC ची ‘ही’ योजना देतेय जबरदस्त परतावा; फक्त १७२ रुपये भरा आणि २८ लाख मिळवा
‘झुंड’ने बॉक्स ऑफिसवर कमाईची अपेक्षा पुर्ण केली का? नागराज मंजुळेंच्या उत्तराने जिंकली लोकांची मनं