Share

युक्रेनच्या सैन्यात रशियाविरोधात लढणारा भारतीय तरुण आहे तरी कोण? जाणून घ्या…

सध्या संपूर्ण जगभराचे लक्ष रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युध्दाकडे लागून राहिले आहे. अशातच ज्या विद्यार्थ्याला त्याच्या उंचीमुळे एकेकाळी भारतीय सैन्याने नाकारले होते तोच विद्यार्थी आता रशियाविरोधात युक्रेनच्या बाजूने लढत असल्याची माहिती केंद्र आणि राज्य सरकारच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

तामिळनाडूमधील 21 वर्षीय एरोस्पेस इंजिनीअर साईनिखेश रविचंद्रन आताच्या घडीला युक्रेनच्या नागरिकांना वाचविण्यासाठी रशियाविरोधात लढत आहे. राज्य सरकारच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, याच रविचंद्रनला भारतीय सैन्याने फक्त त्याच्या उंचीमुळे सेनेत सहभागी करुन घेण्यास नाकारले होते.

काही दिवसांपूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी रविचंद्रनच्या कोईम्बतूरमधील थुडियालूरजवळील सुब्रमण्यमपलायम येथील घरी जाऊन त्याच्या पालकांची भेट घेतली. यावेळी पालकांनी सांगितले की, आम्ही त्याला घरी परत येण्याची विनंती केली आहे. परंतु परत येण्यास त्याने नकार दिला आहे. त्याला तिथेच राहून युक्रेन देशाची मदत करायची आहे.

साईनिखेशने 2018 मध्ये विद्या विकासिनी मॅट्रिक्युलेशन संस्थेत शालेय शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर साईनिखेशने सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न केला परंतु तो तेथेच फसला. यानंतर त्याने अमेरिकेत संधी आहे का याची चौकशी केली. परंतु आपण हे करु शकत नाही असे साईनिखेशच्या लक्षात येताच त्याने सप्टेंबर 2018 मध्ये खारकीव्ह येथील नॅशनल एरोस्पेस युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

यानंतर साईनिखेशच्या आयुष्यात सर्वकाही सुरळीच चालले होते. त्याचा अभ्यास सुध्दा नियमीत सुरु होता. यादरम्यानच रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु झाले. युध्दाच्या काही दिवसांमध्ये साईनिखेशचा कुटुंबाशी काही संपर्क झाला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी युक्रेनमधील भारतीय दूतावासाला ईमेल पाठवून साईनिखेशची चौकशी
करण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. परंतु नंतर त्यांनीच साईनिखेशी कुटुंबीयांना संपर्क साधून दिला. यावेळी साईनिखेशने आपल्या पालकांना सांगितले, मी सुखरुप आहे. इथे युध्द सुरु असल्यामुळे भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर त्याने आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत, मला निमलष्करी दलात
कायम राहण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

यावर साईनिखेशच्या वडिलांशी नाराजी व्यक्त करत त्याला परत भारतात येण्यास सांगितले. परंतु साईनिखेश आपल्या भूमिकेवर ठाम होता. मध्यंतरी टीव्हीवर साईनिखेशची बातमी पाहून कुटुंब थक्क झाले होते.

त्यांनी म्हणले, “जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा तो चार दिवस संपर्कात नव्हता. तेव्हाच आम्ही तामिळनाडूतील तरुण युक्रेनच्या सैन्यात सामील झाल्याचा मीडिया रिपोर्ट पाहिला आणि आम्हाला धक्का बसला,” सध्या कुटुंब साईनिखेशला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सरकारने देखील मदत करण्याचे पुर्ण आश्वासन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या
“देवेंद्र फडणवीसांनी तुमचे कपडे उतरवले, त्यांना कुणीही संपवू शकत नाही”
हॉलिवूडचा डंका! ‘द बॅटमॅन’समोर अमिताभचा ‘झुंड’ मंदावला, वाचा कोणी किती कोटी कमावले..
‘झुंड’ने बॉक्स ऑफिसवर कमाईची अपेक्षा पुर्ण केली का? नागराज मंजुळेंच्या उत्तराने जिंकली लोकांची मनं
“देवेंद्र फडणवीस नटसम्राट असून ते स्टोरी बनवण्यात एक्स्पर्ट आहेत”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now