राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यात भाजपा – शिवसेना वाद काही नवीन नाही. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली आणि भाजप – सेनेत वादाची ठिणगी पडली. सत्तास्थापणेपासून विरोधक सत्ताधारी पक्षातील नेत्यांना धारेवर धरत आहेत. (after balasaheb thackery the title of hinduhridaysamrat should be given to fadnavis says nitesh rane)
तर दुसरीकडे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कंबर कसली जात आहे. अशातच सध्या भाजप नेते नितेश राणे यांच्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. ‘बाळासाहेबांनंतर हिंदूह्रदयसम्राट पदवी फडणवीसांना द्यावी,’ अशी मागणी राणे यांनी केली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अणुशक्तीनगर विधानसभा – वॉर्ड 150 वॉर्डमध्ये कार्यकर्ते संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी नितेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राणे यांनी ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला.
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले, ‘दाऊदशी संबंध आल्यामुळे, नवाब मलिक यांचा राजीनामा आम्ही मागतोय. दाऊदला मदत करणाऱ्या नवबा मलिक यांचे कॅबिनेटपद अजूनही कायम आहे. त्यांना पाठीशी घालत आहात, तर मग मुलांना रस्त्यावर काय सुरक्षा द्याल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच “हिंदूह्रदयसम्राट ही पदवी बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर जर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांना द्यायला हवी, कारण त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे दाऊद कनेक्शन समोर आले आहे, अशी इच्छा नितेश राणे यांनी बोलून दाखवल्याने सध्या सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. आता शिवसेनेच्या भूमिकेडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुढे बोलताना नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात निशाणा साधला आहे. ”बाळासाहेब ठाकरे यांच्या एका डरकाळीने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आवाज पोहचायचा. त्यांच्या वारसांचा आवाज काय हालचाली काय? यांना वाघ कसं म्हणायचं, मॅव मॅव केल मी तर काय चुकीचे आहे, वाघाचे मांजर झालं आहे, असं म्हणत राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना लक्ष केले.
महत्त्वाच्या बातम्या
श्रीलंकन खेळाडू दमलेत, डाव घोषित करा; द्विशतकाचा विचार न करता जड्डूने दाखवलं ‘Spirit Of Cricket’
‘कोण म्हणतं मी म्हातारा झालो.. मी अजून थकलेलो नाही, तुमची साथ असेपर्यंत हा गाडा सुरूच राहील’
२४ तास पोलीसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही…; भाजप नेते नितेश राणेंचे थेट आव्हान
सभा मोदींची पण हवा अजित पवारांचीच! थेट पंतप्रधानांसमोरच राज्यपालांना झापले