दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्न आता या जगात नाही. शुक्रवारी सायंकाळी थायलंडमधील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला. ५२ वर्षीय शेन वॉर्नला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ( cricketer shane warne son on father death)
जगभरातील फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने हैराण करणारा ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर वॉर्नच्या मृत्यूने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तो सामन्यादरम्यान मैदानावर दिसला होता. सचिन तेंडुलकरपासून ते ब्रायन लारापर्यंत सर्वांनी त्याच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. वॉर्नच्या कुटुंबाला व्हिक्टोरियन सरकारने राज्य सन्मान देऊ केला आहे.
शेन वॉर्नचे कौटुंबिक जीवन खूप वादग्रस्त होते. पण याचा परिणाम त्यांच्या मुलांवर कधीही झाला नाही. त्याचा २३ वर्षांचा मुलगा जॅक्सन वॉर्न म्हणाला की, मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. जॅक्सनला समर आणि ब्रूक या दोन बहिणीही आहेत. वॉर्न २००७ मध्येच पत्नीपासून वेगळा झाला होता.
जॅक्सन वॉर्न गेल्या ४ वर्षांपासून त्याचे वडील शेन वॉर्नसोबत मेलबर्नमध्ये राहत होता. तो म्हणाला, ‘माझं आयुष्य खूप निराशाजनक आहे. मी कुठेतरी जायचो तेव्हा लोक म्हणायचे तू शेन वॉर्नचा मुलगा जॅक्सन आहेस. ते जॅक्सन आहे असे कधीच म्हणाले नाही. मला फक्त जॅक्सन व्हायचे आहे.
मला वडिलांना फक्त वडील म्हणून बघायचे आहे. मला त्यांची इतर कोणत्याही पालकांशी तुलना करायची नाही. मला फक्त त्यांना हसत बघायचे आहे. मला वाटते की त्यांनी खूप चांगले काम केले आहे आणि मला त्याचा अभिमान आहे, असेही जॅक्सन वॉर्न म्हणाला आहे. यावेळी जॅक्सनच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यामुळे तो जास्त काही बोलू शकला नाही.
तसेच जॅक्सन वॉर्ननंतर शेन वॉर्नच्या आईनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याची आई म्हणाली, की आता आम्ही जास्त काहीही बोलू शकत नाही. आम्ही सध्या शॉकमध्ये आहोत. त्यांच्या या वक्तव्यावरून त्या किती दु:खात आहे, हे लक्षात येते. जगभरातील त्याचे चाहते मेलबर्नला पोहचून वॉर्नला श्रद्धांजली वाहत आहे.
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी अर्धवट काम झालेल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यासाठी उद्या येत आहेत, शरद पवारांचा टोला
कपिल देवचा ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम रविंद्र जडेजाने काढला मोडून; ‘हा’ विक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज
मोठी बातमी! सोनाक्षी सिन्हा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, वाचा संपूर्ण प्रकरण