राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. या आधीवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा सहभोजनाचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला आहे. (sharad pawar on mamata banarjee)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे कौतूक केले आहे. तसेच राज्यातील चांगल्या कामांमुळे विरोधक अस्वस्थ झाले आहे. सत्ता येते-जाते पण विरोधकांना इतकं अस्वस्थ कधी बघितलं नव्हतं, असेही शरद पवारांनी म्हटले आहे.
राज्यातील मंत्री नवाब मलिकांवर मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईनंतर राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहे. त्यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केले आहे.
इकडे नवाब मलिकांना आत टाकलं तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला होता. ममतांनी सांगितले की आमच्याकडे चार लोकांना अटक झाली आहे. मात्र आम्ही हटलो नाही, लढलो. आम्ही संघटना वाढवली. तुम्हीही तेच करा असा सल्ला त्यांनी मला दिला, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर आक्रमक झाले आहे. जे कधीही इतिहासात घडले नाही, ते महाराष्ट्रात घडत आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत, त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही वा त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. आरोप साधा नाही, तर मुंबईच्या मारेकऱ्यांशी आर्थिक व्यवहार झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी एक मिनिटात अशा मंत्र्याला बाहेर केले असते. हसिना पारकरला पैसे दिले आहे. कोण आहे हसिना पारकर? दाऊदच्या हस्तकांशी आर्थिक व्यवहार केले आहेत. तत्काळ राजीनामा घ्या, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘ही’ नंबर प्लेट असेल तर कोणत्याच राज्यातील पोलिस तुम्हाला अडवणार नाहीत, वाचा केंद्राच्या नवीन प्रोजेक्टबद्दल..
इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही; युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्याने सांगितली तिथली भयानक परिस्थिती
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेने भारताचे पुन्हा केले कौतुक, पंतप्रधान मोदींचे आभार मानत म्हणाले..