Share

दिल्लीने कर्णधार पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर अखेर श्रेयसने सोडले मौन; पहील्यांदाच प्रतिक्रीया देत म्हणाला….

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत श्रेयस अय्यरने चमकदार कामगिरी केली. तसेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये श्रेयस अय्यरलाही नवी जबाबदारी मिळाली आहे. श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. गेल्यावर्षी श्रेयस अय्यर हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. (shreyas iyer on delhi captaincy)

श्रेयस अय्यरने एका मुलाखतीत याबद्दल बोलले आहे आणि सांगितले की, आयपीएलपूर्वी दुखापत होणे हा त्याच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. दुखापत झाली नसती तर मला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले नसते. श्रेयस अय्यरला कर्णधार पदावरुन हटवल्यानंतर ऋषभ पंतला कर्णधार पद देण्यात आले होते.

श्रेयस अय्यरला आयपीएल २०२१ दरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे तो सुरुवातीला खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला कर्णधार बनवले. त्यानंतर कोरोनामुळे आयपीएल थांबवण्यात आले. अशा परिस्थितीत यूएईमध्ये आयपीएल सुरू झाल्यावर श्रेयसने दमदार पुनरागमन केले, पण दिल्लीने ऋषभला कर्णधारपदी कायम ठेवले.

श्रेयस अय्यर या वर्षी दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केला होता. त्यानंतर लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला १२.२५ कोटी रुपयांना विकत घेत संघाचा कर्णधार बनवला. श्रेयस म्हणतो की, काही गोष्टी चांगल्यासाठीच घडतात, त्यांचे परिणाम आपल्याला नंतर कळतात.

श्रेयस अय्यर म्हणाला की, तो कर्णधार असताना शानदार धावा करत होता, पण नंतर दुखापत झाली आणि सर्व काही बदलले. दुखापतीमुळे तो खेळाडू म्हणून निम्मा झाला. पण जे झालं ते चांगलं झालं. आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी, असे मानले जात होते की श्रेयस अय्यर लखनऊ किंवा अहमदाबादच्या संघात सामील होऊ शकतो, कारण दोन्ही संघ नवीन आहेत आणि ते कर्णधाराच्या शोधात होते. पण तसे झाले नाही आणि श्रेयसने लिलावात जाण्याचा निर्णय घेतला.

श्रेयस अय्यरसाठी टीम इंडियातील मागील दिवस खूपच चांगले गेले आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने शतक झळकावले. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याने तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकले. श्रेयसला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-
आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ समोर कंगनाचे सिनेमे भुईसपाट, बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
कंगना राणावतने सीतेच्या भूमिकेसाठी घेतले तब्बल ‘इतके’ कोटी, ठरली बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री
‘या’ अभिनेत्याच्या भावाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी अमिताभ यांनी केला होता ‘खुद्दार’, भावनिक आहे किस्सा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now