Share

रशिया-युक्रेन युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल? जाणून घ्या सविस्तर….

सध्या युक्रेन आणि रशिया यांचे युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेन ची परिस्थिती खराब होत आहे. मात्र अशातच युक्रेनवरील हल्ल्याबाबत काही भारतीय रशियाची बाजू घेत आहेत. त्यांना रशियाने युक्रेन वरती हल्ला केला याचे काहीही वाईट वाटत नाही. रशियाप्रमाणे भारताने सुद्धा पीओकेवर( पाक व्याप्त काश्मीर) हल्ला का करू नाही असा विचार काही लोक करत आहेत.

नक्कीच भारतातील काही लोकांचा विचार जरी चांगला असेल तरी त्यामागे असणारे अडथळे जाणून घेणं आवश्यक आहे. कारण सध्या युक्रेन वरती रशिया हल्ला करत आहे, युक्रेन शरणागती स्वीकारण्याच्या परिस्थितीत आहे. मात्र रशिया एवढी सक्षमता नक्कीच आपली नाही. रशियाकडे आपल्यापेक्षा खूप मजबूत सैन्य आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाबद्दल बोलायचे झाले तर, या युद्धाचा भारतावर मोठा परिणाम होईल. भारताची अर्थव्यवस्था बिघडेल. त्यामुळे सध्या रशियाच्या विरोधात जाऊन युक्रेन ला मदत करणं भारताच्या हाताबाहेर आहे. युक्रेन ला मदत केली तर येणाऱ्या काळात भारताचे आर्थिक बजेट बिघडेल हे नक्की.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने फक्त भारतच नाही तर जागतिक बाजारपेठेवर सुद्धा संकटाचे गडद ढग आणले आहेत. कारण रशिया हा खनिज तेल आणि वायूचा प्रमुख उत्पादक आहे. याव्यतिरिक्त, रशिया आणि युक्रेन देखील मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादने आणि धातू निर्यात करतात.

रशियावर जर अमेरिका आणि युरोपीय देशांनी बंदी घातली तर नक्कीच ही पुरवठा साखळी विस्कळीत होईल, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेतील अनेक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होईल. यामुळे महागाई एका नवीन पातळीवर जाऊ शकते. याचा परिणाम आपसूकच भारतावर होईल.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की अनेक वस्तूंचे भाव वाढतात आणि मग महागाईचा दर सांभाळणे कठीण होऊन बसते. हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा हा भारताला सर्वात मोठा धोका आहे. सध्या ब्रेंट तेलाची किंमत प्रति बॅरल 94.51डॉलर आहे. अलीकडे ते प्रति बॅरल 101 डॉलर वर पोहोचले होते.

रशिया हा कच्च्या तेलाचा प्रमुख निर्यातदार आहे. अनेक युरोपीय देश त्यांच्या उर्जेच्या गरजांसाठी रशियावर अवलंबून आहेत. यामध्ये गॅसचा पुरवठा महत्त्वाचा आहे. रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीत सातत्याने वाढ होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम भारतावर होऊ शकतो.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पुढील आर्थिक वर्षात देशातील पेट्रोलियम उत्पादनांची मागणी 214.5 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा पेट्रोलियम उत्पादनांचा ग्राहक आहे. तसेच, पुढील आर्थिक वर्षात देशातील पेट्रोल आणि डिझेलचा वापर विक्रमी उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. आपला देश 85 टक्के तेल बाहेरून आयात करतो. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर आयात बिल नक्कीच बिघडेल आणि बजेटचे गणित बिघडेल.

आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now