मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानात शनिवारपासून उपोषण सुरू केले. ’15 दिवसांत मराठा आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार संभाजी छत्रपती (sambhajiraje) यांनी म्हंटले आहे.
कालच्या दिवसभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच अनेक नेत्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावली, तसेच संभाजीराजे यांची भेट घेतली. भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावरून आता राजकारण चांगलच रंगलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. आझाद मैदानात संभाजीराजेंनी जे आंदोलन सुरू केलय त्यास माझा संपूर्ण पाठिंबा असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना ते विखे पाटील म्हणाले, ‘संभाजी छत्रपती यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत एकाही आश्वासनाची सरकारने पू्र्तता केलेली नाही. मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय. त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी,अशी टीका विखे पाटील यांनी केली.’
दरम्यान, विखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. अजित पवार बेजबाबदार पणे विधाने करत आहेत. नैतिकता शिल्लक नसल्याने ते बेजाबदार विधाने करत आहेत. त्यांनी मंत्रिमंडळातच राहू नये, अशी मराठी समाजाची भावना आता झालीय, असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटलं आहे.
तर दुसरीकडे याबाबत बोलताना संभाजीराजे यांनी सांगितले की, ‘मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे; पण याला संभाजीराजे यांनी विरोध दर्शविला. एक मागासवर्गीय आयोग असताना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाची दिशाभूल करू नये.’
महत्त्वाच्या बातम्या
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल? जाणून घ्या सविस्तर….
बलाढ्य रशियासोबत भिडणाऱ्या झेलेन्स्की यांची ‘ही’ धारदार वक्तव्ये देतात धाडसी नेतृत्वाचे उदाहरण …
मोठी बातमी! राणेंच्या अडचणीत वाढ, लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर FIR दाखल
धक्कादायक! वाढदिवसाच्या पार्टीला बोलवून शिक्षिकेला पाजली दारू; नंतर दोघांनी केला बलात्कार