Share

शेतकऱ्याचा नाद नाय! एक गुंठ्याची शेती नेली ८ एकरावर, सालगडी म्हणून काम करणारा बनला करोडपती

शेतकरी अनेकदा शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. काही शेतकरी हे असे प्रयोग करतात की त्यातून त्यांची चांगली कमाई पण होते. असेच एक प्रकरण मराठवाडाच्या विदर्भ सीमेवर असलेल्या पानकनेर गावातून समोर आले आहे. येथे सालगडी म्हणून काम करणारा शेतकरी आता कोट्यवधीश झाला आहे. (santosh shinde nursing)

पानकनेर गावात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव संतोष शिंदे असे आहे. त्याने तब्बल ८ एकर जमिनीवर नर्सरी उभी केली आहे. या नर्सरी उद्योगातून ते वर्षभरात ६ कोटींची उलाढाल करतात. अल्पभूधारक म्हणून त्यांची ओळख होती. शेतीला पाणी नसल्यामुळे त्यांनी सालगडी म्हणूनही काम केले आहे.

सालगडी असतानाही संतोष यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी नर्सरी व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यांनी सुरुवातीला एक गुंठ्यात नर्सरी व्यवसाय सुरु केला. तेव्हा त्यांनी झेंडूच्या रोपट्याचे उत्पादन घेतले. त्यांना याच्यात चांगला आर्थिक फायदा झाला, त्यामुळे त्यांनी हाच व्यवसाय मोठा करण्याचे ठरवले.

पाणी नव्हते, त्यामुळे संतोष यांनी त्यालाही पर्याय शोधला. संतोष यांनी भव्य विहीर खोदली. या विहीरीला चांगले पाणी लागले. नर्सरीचा हा व्यवसाय वाढू लागला आणि आता ही नर्सरी ८ एकर शेत जमिनीवर केली जात आहे. या नर्सरीत तंत्रज्ञानाचा वापर करत मिरची, टोमॅटो, झेंडू, पपई, टरबूज, खरबूज यासारख्या अनेक दहा ते बारा प्रजातीच्या रोपट्यांचे उत्पादन घेतले जाते. तसेच या नर्सरीमुळे १०० लोकांच्या हाताला काम मिळाले आहे.

संतोष शिंदे या व्यवसायातून वर्षाकाठी ६ कोटींची उलाढाल करतात. रोपट्यांच्या गुणवत्तेमुळे या रोपट्यांना महाराष्ट्रासोबत अनेक राज्यातून चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे संतोष शिंदे हे रोपटे ग्राहकांना घरपोच देत असतात. तसेच या वाहतूकीसाठी शिंदे यांनी ४ ट्रकही विकत घेतले आहे.

ग्राहक फोन करुन संतोष शिंदे यांना हवे असलेल्या रोपट्यांबाबत सांगतात, त्यानंतर संतोष शिंदे ठरलेल्या पद्धतीने ग्राहकांच्या शेतात रोपटे पोहचवतात. शिंदे यांनी केलेल्या या अनोख्या प्रयोगाची फक्त त्या गावात नाही, तर राज्यभरात चर्चा आहे. तसेच कष्ट आणि काही नवीन करण्याच्या जिद्दीवरच सालगडी म्हणून काम करणारे संतोष आज करोडपती झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
bharatpe controversy: अशनीर ग्रोवर यांच्या बायकोने दारू पार्टीचा व्हिडीओ केला शेअर, केले गंभीर आरोप
सलाम! लेकीचे अंत्यसंस्कार करून संघासाठी मैदानात उतरला आणि झळकावले शतक
युट्यूबर गणेश आणि योगिता शिंदे यांना गाडी घेतल्यानंतर धमक्यांचे फोन, एवढे पैसे आले कुठून?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now