अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात निषेध नोंदविताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष अशोक गावडे यांनी अमृता फडविसांविरोधात एक आक्षेर्पार्ह वक्तव्य केले होते. आता त्यांच्या याच वक्तव्याने गावडे यांना अडचणीत आणले आहे. गावडे यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी, “आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा तुम्हाला नवी मुंबईत महिला फिरू देणार नाही” असा इशारा अशोक गावडे यांना दिला आहे. अमृता फडविसांविरोधात गावडे यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध नोंदवत, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी की करू नये हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.
मात्र, आम्ही उद्या त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार करणार आहोत आणि त्यांना नवी मुंबईतही फिरू देणार नाही. त्यांच्या तोंडाला जर काळे फासले नाही, तर मी नावाची मंदा म्हात्रे नाही. असे वक्तव्य मंदा म्हात्रे यांनी केले आहे. त्याचबरोबर उद्या आम्ही गावडेंविरोधात पोलिस तक्रार दाखल करणार आहोत अशी माहिती मंदा यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे.
बुधवारी नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात काँग्रेसचे अनिल कौशिक, शिवसेनेचे विठ्ठल मोरे आणि अशोक गावडे उपस्थित होते. यावेळी भाषण करताना अशोक गावडे यांची जीभ घसरली.
अमृता फडविसांविरोधात वक्तव्य करत गावडे यांनी म्हटले की, आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते. त्याच्या या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. यातच आमदार मंदा म्हात्रे यांनी गावडे यांच्यावर निशाना साधला.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका करत म्हटले की, अशोक गावडे यांनी निदर्शने करता अपशब्द वापरले ते तोंडातही घेऊ शकत नाही. नवी मुंबईकरांच्यावतीने आम्ही त्यांचा निषेध करतो. महिलांना अपशब्द वापरणे हे आपल्या कोणत्या संस्कृतीत आणि संस्कारात बसते, हे त्यांनी लोकांना सांगितले पाहिजे. त्यांच्याविरोधात ज्या तक्रारी आहेत त्या काढल्या तर कोणताही पक्ष त्यांना जिल्हाध्यक्ष करू शकत नाही.
दरम्यान उद्या गावडे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली तर राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद आणखीन चिघळणार आहे. महत्वाचे म्हणजे गावडे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
पेट्रोल, डिझेलनंतर खाद्यतेलांचे भाव गगनाला भिडले; आजचे भाव वाचून तुमचेही डोके चक्रावेल
भर पत्रकार परिषदेत ‘या’ प्रश्नावर अजितदादा भडकले; “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात”
रशिया-युक्रेन युद्धामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण, पेट्रोल डिझेलनंतर खाद्यतेलांचे भाव कडाडले