Share

१८ हजार पगार असणाऱ्या गोविंदकडे करोडोंची संपत्ती, ४ घरं, २९ एकर जमीन; संपत्ती पाहून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम

मध्य प्रदेशमधील उज्जैनच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवास जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाच्या घरावर छापा टाकला आहे. मंगळवारी सकाळपासून ही छापेमारी सुरू झाली. या छाप्यात कोट्यवधींची मालमत्ता उघड झाली आहे. कन्नडजवळील डोकाकुई गुडबेल गावातील सेवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्यानंतर ईओडब्ल्यू टीमने कारवाई केली आहे. (mp govind bagwan currept employee office raid)

सुरुवातीच्या तपासात आरोपी कामगाराकडे कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली असून, त्याचा पगार केवळ १८ हजार रुपये आहे. आरोपी गोविंद बागवान याने २९ एकर जमीन काळ्या पैशातून खरेदी केली आहे. त्याचबरोबर छाप्यादरम्यान ईओडब्ल्यू टीमला चार घरांची माहिती मिळाली आहे.

चारही घरांची किंमत लाखोंच्या घरात आहे. हे अतिशय आलिशान पद्धतीने बनवले आहे. १८ हजारांच्या पगारात गोविंद बागवानने हे सर्व असताना, काळ्या पैशांच्या मदतीने त्याने एवढे केले आहे. यामुळे तपास पथकालाही धक्का बसला आहे. त्याची मालमत्ताही पत्नी आणि मुलाच्या नावावर आहे.

आरोपी गोविंद बागवान याच्याकडे २९ बिघे जमीन आहे. त्याची किंमत आज करोडोंमध्ये आहे. यासोबतच सोन्या-चांदीचे दागिनेही सापडले आहेत. ईओडब्ल्यू टीमला घरातून रोख रक्कमही मिळाली आहे. यासोबतच अनेक बँकांमध्ये खातीही सापडली आहेत. त्या बँक खात्यांमध्येही पैसे जमा आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. यासोबतच आरोपीच्या अनेक पॉलिसीही आहेत. ईओडब्ल्यू टीम घरातून सापडलेल्या कागदपत्रांची छाननी करत आहे.

काळ्या पैशासोबतच बनावट कागदपत्रे तयार केल्यामुळे सहकार व्यवस्थापकाच्या अडचणीही वाढू शकतात. त्याच्या घरावर छापा टाकताना ईओडब्ल्यू टीमने बनावट पॅन आणि मतदार ओळखपत्र जप्त केले आहे. याबाबत आरोपी गोविंद बागवान याच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल होऊ शकतो. ईओडब्ल्यू डीएसपी अजय कैथवास यांनी त्यांच्या टीमसह ही संपूर्ण कारवाई केली आहे.

एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा लपवण्यासाठी आरोपी गोविंद बागवानने बनावट कागदपत्रे तयार करून घेतली होती. कागदावर त्याची दोन मुले प्रवीण आणि अरविंद यांच्या वयात बदल करून स्वत:च्या भावालाच त्याच्या मुलांचे वडिल बनवले होते. जेणेकरून त्यांची बेनामी संपत्ती धोक्यात येऊ नये. मात्र भ्रष्ट कर्मचाऱ्याच्या सर्व युक्त्या पकडल्या गेल्या आहेत.

सहकारी संस्था व्यवस्थापक गोविंद बागवान यांचे सध्याचे वेतन १८ हजार आहे. मात्र त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. मालमत्तेची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात गोविंदाचीच चर्चा आहे. त्यांच्याकडे एकूण ३.४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर खोटे कर्ज सांगून गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचे पैसे हडप केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात आरोपी गोविंद बागवान याच्याविरुद्ध एफआयआरही दाखल करण्यात आला होता. यासाठी गोविंद बागवान तुरुंगातही गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
ज्या वुहानच्या लॅबमधून कोरोनाचा प्रसार झाला, त्या लॅबचे मालक…; मेधा पाटकरांच्या दाव्याने उडाली खळबळ
रशियाला नमवण्यासाठी बायडन यांनी सोपवली भारतीयावर जबाबदारी; जाणून घ्या कोण आहे दलीप सिंग?
जागरण गोंधळात हलगी वाजवणारा बाळू तृतीयपंथी सपनावर झाला फिदा, आता दोघेही करणार लग्न

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now