ईडीने बुधवारी दुपारी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. सुमारे ८ तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. अटकेनंतर नवाब मलिकांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर मलिकांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. (nawab malik twitter account)
सुनावणीदरम्यान, ईडीने मलिकांच्या कोठडीसाठी न्यायालयाकडे १४ दिवसांची कोठडी मागितली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने नवाब मलिकांना ८ दिवसांची म्हणजेच ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांना अटक झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अटकेनंतर मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर लिहिले होते की, घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. २०२४ साठी तयार रहा. त्यानंतर काही वेळाने आणखी एक ट्विट त्यांनी केले होते. त्यामध्ये, थोडा वेळ शांत आहे, तुमची वेळ आली आहे, आमचा काळ येईल, असे नवाब मलिकांनी म्हटले आहे. सध्या नवाब मलिकांचे हे ट्विटही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Today morning the ED had come to @nawabmalikncp saheb's residence. They accompanied saheb in his vehicle to the ED office. Advocate Amir Malik, Saheb's son has accompanied saheb along with.
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) February 23, 2022
तसेच नवाब मलिकांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही याबाबत माहिती देण्यात आली आहे. नवाब यांच्या अकाऊंटवरुन ट्विट रिट्विट करण्यात आले आहे. पण इथे लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की जर नवाब मलिक ईडी कार्यालयात होते, तर त्यांनी ट्विट कसे केले?
त्यामुळे मलिक यांनी आपले ट्विटर हँडल कोणालातरी दिले असावे. तसेच त्यावर लिहीणारी व्यक्ती ही मलिकांच्या खास विश्वासातील असेल असा अंदाज लावण्यात येत आहे. तसेच ईडीच्या चौकशीत अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करता येते का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
ना डरेंगे ना झुकेंगे!
सत्य जिंकेलच..!!@nawabmalikncp#WeStandWithNawabMalik pic.twitter.com/ioFbw8xiNO— Babajani Durrani (@babajanidurrani) February 23, 2022
दरम्यान, नवाब मलिकांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन बुधवारी ३.४६ वाजता ट्विट करण्यात आलं आहे. त्यामध्ये लडेंगे जितेंगे और सबको एक्सपोज करेंगे असे म्हटले आहे. तर ४.३९ वाजता नवाब मलिकांनी एक ट्विट रिट्विट केलं आहे. त्यामध्ये ना डरेंगे, ना झुकेंगे… सत्य जिंकेन, असे म्हटले आहे. बाबाजानी दुर्रानी यांचे ही ट्विट नवाब मलिकांनी रिट्विट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्या वुहानच्या लॅबमधून कोरोनाचा प्रसार झाला, त्या लॅबचे मालक…; मेधा पाटकरांच्या दाव्याने उडाली खळबळ
रशियाला नमवण्यासाठी बायडन यांनी सोपवली भारतीयावर जबाबदारी; जाणून घ्या कोण आहे दलीप सिंग?
जागरण गोंधळात हलगी वाजवणारा बाळू तृतीयपंथी सपनावर झाला फिदा, आता दोघेही करणार लग्न