मुंबई महानगरपालिका निवडणूकांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच आता मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपत आहे. पण अजूनही याठिकाणी निवडणूक न लागल्याने याठिकाणी प्रशासकाची नेमणूक होणार आहे. आता सभागृहाची मुदत अवघी १५ दिवस राहिली आहे. (shivsena corporater in mumbai corporate)
फक्त शेवटच्या १५ दिवसांमध्ये देखील आता शिवसेना नगरसेवकांच्या संख्येत वाढ होताना दिसून येणार आहे. शिवसेनेचे महानगरपालिकेत ९६ नगरसेवक आहे, पण आता हे आता ९७ होणार आहे. यामुळे आता फक्त १५ दिवसांसाठी शिवसेनेचा पराभूत उमेदवार नगरसेवक होणार आहे.
२०१७ मध्ये प्रभाग क्रमांक १५९ मध्ये भाजपचे प्रकाश मोरे निवडून आले होते. तर शिवसेनेच्या कोमल जामसांडेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यानंतर प्रकाश मोरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याची तक्रार कोमल यांनी केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.
आता यावर निर्णय देताना लघुवाद न्यायालयाने निवडून आलेले भाजप नगरसेवक प्रकाश मोरे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश दिले आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकाची मते मिळणाऱ्या उमेदवाराला म्हणजेच कोमल जामसांडेकर यांना नगरसेवक बनवण्याचे आदेशही देण्यात आले आहे.
याप्रकरणी प्रकाश मोरे यांच्या वकिलाने या आदेशाविरोधात वेळ मागून घेतला आहे. मात्र न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता प्रकाश मोरे यांचे पद रद्द होऊन कोमल यांना काही दिवसांसाठी नगरसेवक पद दिले जाणार आहे.
कोमल जामसांडेकर यांना काही दिवसांसाठी नगरसेवक पदाचा कार्यभार सांभाळता येणार आहे. ७ मार्चनंतर सभागृहाचा काळ संपल्यानंतर पालिकेवर नवा प्रशासक नेमला जाणार आहे. निकाल शिवसेनेच्या बाजूने लागल्यामुळे शिवसेनेला एका नगरसेवक पदाची लॉटरी लागल्याची चर्चा सगळीकडे होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
चीनकडून कर्ज घेऊन श्रीलंका झालाय कर्जबाजारी, पेट्रोल डिझेल घ्यायलाही नाहीत पैसै, ‘अशी’ झालीये अवस्था
प्रेमाची अजब कहाणी! 80 वर्षांचे आजोबा पडले 84 वर्षांच्या आजीच्या प्रेमात; दोघे पळून गेले मात्र….
“आमच्या मुलीला बदनाम करू नका”, दिशा सालियानच्या आईने भाजप नेत्यांना झापले