Share

धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाशी भिडली आई, १२ तास ठेवलं पकडून अन्…

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात महिला अत्याचाऱ्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. असे असतानाच आता कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ट्रेनमध्ये ६ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. (women caught rapist in train)

चालत्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका २५ वर्षीय मुलाने ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही ट्रेन उत्तर प्रदेशातील गोरखपूरहून मुंबईला येत होती. आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून अटक केली. ही घटना घडली तेव्हा एक्सप्रेस ट्रेन मध्य प्रदेशातून जात होती.

पीडित कुटुंब उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ जिल्ह्यातून ठाण्याला येत होते. मुलगी तिची आई आणि तीन बहिणींसोबत प्रवास करत होती. १५ फेब्रुवारी रोजी ट्रेन तिमरनी येथे पोहोचली तेव्हा आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सोनू प्रजापती असे आरोपीचे नाव आहे.

मुलगी आणि तिची आई झोपली असताना प्रजापतीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीला जाग आली आणि तिने तत्काळ आईला माहिती दिली. आरोपीने लगेचच घटनास्थळावरून पळ काढला आणि शौचालयात लपला. पीडितेच्या आईने आरोपीच्या दिशेने धाव घेतली आणि इतर प्रवाशांच्या मदतीने त्याला पकडले.

त्यानंतर मुलीच्या आईने ठाण्यात असणाऱ्या पतीला याबाबत माहिती दिली. यानंतर त्याने कल्याण जीआरपीला माहिती दिली. माहिती मिळताच जीआरपीने औरंगाबाद आणि इगतपुरी येथील पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली मात्र त्यांना वेळेवर गाडी थांबवता आली नाही.

१२ तासांनंतर जीआरपीने आरोपीला कल्याण रेल्वे स्थानकावरून पकडले. त्यानंतर प्रजापतीला मध्य प्रदेशातील इटारसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रजापती हा मजूर असून कामाच्या शोधात मुंबईत येत होता. पोलिसांनी आरोपींविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मी त्यांचा शिवसैनिक आहे आणि…; तुरुंगातून सुटल्यानंतर हिंदूस्थानी भाऊचे मोठे वक्तव्य
आघाडीतच बिघाडी! काँग्रेसने शिवसेनेवर लावला तब्बल ५०० कोटींच्या घोटाळ्याचा खळबळजनक आरोप
शिवसेनेत इनकमिंग! पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप, राष्ट्रवादीला गळती; राजकीय समीकरण बदलणार?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now