वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरील हक्कांसाठी ‘वारस नोंदणी’ कशी करतात? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

सध्याच्या काळात आपला वारसा हक्क कोणताही व्यक्ती सहजासहजी चुकवत नाही. त्यामुळे प्रत्येकच व्यक्तीला वारसा हक्कासंबंधी जाणून घेण्याची उत्सुकता असते. हीच उत्सुकता लक्षात घेऊन आज आपण या विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीचे निधन धाले तर त्याची संपत्ती सरकारीदृष्ट्या वारसाकडे सोपवण्यात येते.

परंतु अनेकवेळा वारसाचे नाव पूर्वजांच्या सात-बाराच्या उताऱ्यात आलेले नसते. मात्र तरी देखील तो सातबारा वारसाला दुरुस्त करता येतो. पुर्वजांच्या मृत्युचा दाखला आणि आपले त्या व्यक्तीशी असलेले संबंध कागदोपत्री दाखवत वारसदार संपत्ती वा जमिन आपल्या नावावर करुन घेऊ शकतो.

वारसदाराचा जमिनीवरील हक्क तयार झाल्यानंतर त्याला याची माहिती जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४९ प्रमाणे ३ महिन्याच्या आत तलाठ्याला कळवावी लागते. तसे न केल्यास त्याला दें भरावा लागतो. वारस नोंद करण्यासाठी वारसदाराला व्यक्तीशी नाते असलेला पुरावा सादर करावा लागतो. व्यक्तींचा किंवा पुर्वजांचा मृत्यू दाखला दाखवत वारसदार आपले नाते सांगू शकतो.

सुरूवातीच्या काळात जन्म मृत्युची नोंद ठेवण्याची जबाबदारी तलाठ्यांवर होती. परंतु त्यानंतर ती तहसिल कार्यालयात नोंदविण्यात आली. त्यानंतर पुन्हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यानंतर जन्म मृत्युची नोंद ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे देण्यात आली.

यामध्ये जन्म आणि मृत्युच्या नोंदिची गरज लक्षात घेत केंद्र सरकारने याकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. केंद्र सरकारने जन्म मृत्यु नोंदणी कायदा १९६९ तयार केल्यानंतर त्याची खरी अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये १९७० साली झाली. यानंतर यामध्ये अनेक दुरूस्त्या देखील करण्यात आल्या. शेवटी २००० मध्ये या नियमांना महाराष्ट्र राज्य जन्म मृत्यु नोंदणी नियम २००० असे संबोधण्यात आले.

वारसदाराला जर पूर्वजांच्या मृत्युबाबत माहिती नसेल तर तो तलाठीकडे चौकशी करू शकतो. यासंबंधी प्रक्रिया कोणताही एक वारसदार करू शकतो. वारसदाराने केलेल्या अर्जाची चौकशी करून तलाठी वारसाची नोंद गाव नमूना ६ मध्ये करतो. ही नोंद होताच गाव नमुना ६ मध्ये देखील याची नोंद करण्यात येते. त्यानंतर गाव अधिकार सात-बारामध्ये वारसहाराची नोंद योग्य माहिती तपासून करतात.

महत्वाच्या बातम्या
वडापाववर ताव मारून पैसै न देताच नेते झाले सैराट, मग कार्यकर्त्यांनीच भरलं बिल, बिलाचा व्हिडीओ व्हायरल
अभी तो मैं जवान हूं! १०० व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर, नवरीचं वय वाचून अवाक व्हाल
पहिल्याच भेटीत दोन मित्रांच्या बायकांचे एकमेकांवर जडले प्रेम, पतींना घटस्फोट देत उचललं मोठं पाऊल
पहिल्याच भेटीत दोन मित्रांच्या बायकांचे एकमेकांवर जडले प्रेम, पतींना घटस्फोट देत उचललं मोठं पाऊल