‘विवाह’ ही गोष्ट आपल्या सर्वांच्याच आयुष्यातली सर्वात आनंदाची गोष्ट असते. जशी शिक्षणाला वयाची अट नसते तशी प्रेमालाही वयाची अट नसते. कधी कोण कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येऊ शकत नाही. तसेच हौसेला ही मोल नाहीये. अलीकडे आपल्याला सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात. (Old Man Married at Age of 100)
तसेच आज काल अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा करण्याची पद्धत निघाली आहे. असे आपण अनेक हटके विवाह सोहळे पाहिले असतील. नवरदेवाची जिसीबीमधून वरात, नवरीची बैलगाडीतून पारंपरिक पद्धतीने एंट्री, किंवा लग्नात नवरीने केलेला भन्नाट डान्स, इ. असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात.
आता अशाच एका विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तुमचा ही विश्वास नाही बसणार पण, या वराचे वय 100 वर्ष आहे तर नवरीचे वय 90 वर्ष आहे. वयाच्या १००व्या वर्षी बोहल्यावर चढण्या मागचे कारण ही तसे हटकेच आहे. कारण वाचून तुम्ही देखील डोक्याला हात लावालं. चला तर मग जाणून घेऊ या नक्की प्रकरण काय..
ही घटना आहे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील. येथे राहणाऱ्या विश्वनाथ सरकार यांनी बुधवारी आपली ९० वर्षीय पत्नी सरोधवानी यांच्यासोबत भव्य विवाह केला. शंभराव्या वाढदिवसी काहीतरी खास करायचं असं त्यांच्या नातवंडांनी ठरवलं होतं. त्यानुसार त्यांनी हा विवाह सोहळा पार पडला.
नातींनी ९० वर्षाच्या नवरीला तयार होण्यासाठी मदत केली. तर नातू आजोबांना तयार करत होते. विश्वनाथ सरकार बुधवारी आपल्या नवरीला आणण्यासाठी तिच्या घरी घोडीवर बसून गेले. दोघांनाही अगदी नवरी-नवरदेवाप्रमाणे सजवलं गेलं होतं. लग्नासोबतच भोजनाची व्यवस्थाही केली गेली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या कपलचं लग्न १९५३ साली झालं होतं. या कपलची मुलं, नातवांडं आणि परतवांडं इतर राज्यांमध्ये राहतात. मात्र, या लग्नासाठी त्यांनीही हजेरी लावली. या अनोख्या विवाह सोहळ्याबद्दल या वृद्ध दाम्प्त्याची सून गीता सरकारने सांगितलं की, ‘ही कल्पना सुचली तेव्हा मी कुटुंबातील इतर सदस्यांनाही याबद्दल सुचवलं आणि सगळ्यांना ही कल्पना आवडली’.
महत्त्वाच्या बातम्या
मोठा खुलासा! भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत होते संबंध, यापैकी दोघी तर होत्या आयएएस अधिकारी..
अजितदादांचा संताप अनावर; म्हणाले, तू कुणाची सुपारी घेऊन आलाय का? असं चालणार नाही
पहिल्याच भेटीत दोन मित्रांच्या बायकांचे एकमेकांवर जडले प्रेम, पतींना घटस्फोट देत उचललं मोठं पाऊल
शिवाजी महाराजांची ‘ही’ मंदिरे तुम्हाला माहित व्हायलाच पाहीजेत? एक तर राजाराम महाराजांनी बांधलेय