चला बसुया! पुरुषांपेक्षा महिलाच जास्त म्हणताय, दारु पिण्याऱ्यांची ‘ही’ आकडेवारी बघून बसेल धक्का

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) च्या नुकत्याच आलेल्या अहवालात महिलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. एनएफएचएसने ओडिशाच्या संदर्भात जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या 5 वर्षांत दारू पिणाऱ्या पुरुषांची संख्या कमी झाली आहे, तर महिलांची संख्या वाढली आहे. (women drinking percentage)

अहवालानुसार, राज्यात २०१५-१६ मध्ये १५ वर्षांवरील महिलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण २.४ टक्के होते, ते २०२०-२१ मध्ये ४.३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच पुरुषांच्या बाबतीत, २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ३९.३ टक्के होते, ते २८.८ टक्क्यांवर आले आहे.

शहरी लोक जास्त दारू पितात हा समजही या अहवालाने मोडीत काढला आहे. ताज्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की ओडिशाच्या ग्रामीण भागात १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे पुरुष आणि स्त्रिया शहरी महिला आणि पुरुषांपेक्षा जास्त दारू पितात. या सर्वेक्षणानुसार, २२.७ टक्के शहरी पुरुषांच्या तुलनेत ३०.२ टक्के ग्रामीण पुरुष दारू पितात.

अहवालानुसार, शहरी भागात दारू पिणाऱ्या पुरुषांची संख्या ३२.२ टक्क्यांवरून २२.७ टक्क्यांवर आली आहे. तर मद्यपान करणाऱ्या महिलांच्या बाबतीत ग्रामीण आणि शहरी वाटा अनुक्रमे ४.९ टक्के आणि १.४ टक्के आहे. या अहवालात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे ग्रामीण महिलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण २.६ टक्क्यांवरून ४.९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

तसेच पुरुषांच्या बाबतीत ते ४१.३ टक्क्यांवरून ३०.२ टक्क्यांवर घसरले आहे. अहवालात आणखी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे गेल्या पाच वर्षांत शहरी महिलांच्या मद्यपानात विशेष बदल झालेला नाही. हा आकडा १.३ टक्क्यांवरून १.४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

पुरुषांच्या तुलनेत केवळ दारूच नाही तर तंबाखूच्या सेवनातही महिलांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. २०१५-१६ या वर्षात केवळ १७.३ टक्के महिलांना तंबाखूचे सेवन करण्याची सवय होती, तर ताज्या सर्वेक्षणानुसार हा आकडा २६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शहरांमधील १६.६ टक्के महिला तंबाखूचा वापर करतात, तर खेड्यांमध्ये २६ टक्के स्त्रिया तंबाखू खातात. तंबाखू सेवन करणाऱ्या पुरुषांची संख्या ५५.९ टक्क्यांवरून ५१.६ टक्क्यांवर आली आहे. ग्रामीण भागात हा आकडा ५८.८ टक्क्यांवरून ५४.१ टक्के आणि शहरी भागात ४५.३ टक्क्यांवरून ४०.५ टक्क्यांवर आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधान नरेंद्र मोदी चुका सुधारत नाही, ते फक्त नेहरुंना जबाबदार धरतात; मनमोहन सिंग मोदींवर संतापले
सामना जिंकल्यानंतरही विराटवर भडकला रोहित? राग झाला अनावर, वाचा नेमकं काय घडलं..
खळबळजनक! पुण्यात प्रसिद्ध बिल्डरने तरूणीवर केला बलात्कार, डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल