Share

शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर; तीन जण ताब्यात

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या पुलवामा घटनेबाबत ऐकून आजही अंगावर काटा येतो. दोन वर्षांपूर्वी १४ फेब्रुवारीला जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा याठिकाणी दहशतवाद्यांनी मोठा घातपात घडवला होता. यामध्ये अनेक भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले होते. (3 terrorist arrested who plan about saibaba mandir)

आता शिर्डीच्या साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा बेत दहशतवाद्यांनी आखला होता, अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे. याप्रकरणी गुजरात एटीएसने दुबईहून आलेल्या तीन जणांना अटक केली आहे. त्यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा बेत आखला होता, असे त्यांनी कबूल केले आहे.

दहशतवाद्यांच्या कटाची माहिती समोर येताच शिर्डीत खळबळ उडाली आहे. तसेच यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मौलाना शब्बीर पठाण, अयुब झबरावाला आणि मौलाना गनी उस्मानी असं अटक केलेल्या तीन दहशतवाद्यांची नावं असून ते दुबईहून भारतात आले होते.

तिन्ही दहशतवाद्यांचा पाकिस्तानातील एका दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती एटीएसने आता दिली आहे. गुप्त माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने कारवाई करत संबंधित तिन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. संबंधित अतिरेक्यांकडून अवैध हत्यारे आणि विस्फोटक पदार्थ जप्त केले आहे.

अटक केलेल्या दहशतवाद्यांनी एका हिंदी चॅनेलच्या संपादकाच्या शिर्डीतील घराची देखील पाहणी केली होती. या घटनेमुळे संपुर्ण शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही दहशतवादी वेळेत पकडल्या गेल्यामुळे एक भयानक घटना होण्यापासून रोकली गेली आहे.

शिर्डी हे देशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून करोडो भाविक दरवर्षी या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. साई मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याबाबत धमकीचे पत्र, मेलच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहे. अशात तीन दहशतवाद्यांना अटक केल्यामुळे शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
राहुल बजाज: कधीही न डगमगणारे नेतृत्व, सरकारसमोरही ज्यांचा आवाज होता बुलंद, वाचा त्यांच्याबद्दल..
मुकेश अंबानींचे छोटे बंधू अनिल अंबानींनी असं काय केलं की त्यांना शेअर मार्केटने बॅन केलं?
‘महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना घाबरणार नाही’, संजय राऊंताची गर्जना

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now